शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

ऑर्डर केला 70 हजारांचा iPhone पण मिळालं 5 रुपयांचं नाणं अन् साबण; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 14:28 IST

iphone 12 worth rs 70000 on amazon receives vim bar : आयफोन 12 च्या ऐवजी एका ग्राहकाला चक्क साबण आणि पाच रुपयांचं नाणं बॉक्समध्ये मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. आयफोन 12 च्या ऐवजी एका ग्राहकाला चक्क साबण आणि पाच रुपयांचं नाणं बॉक्समध्ये मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नूरूल अमीन या व्यक्तीने मोठ्या उत्साहात अ‍ॅमेझॉनवरून आयफोन 12 ऑर्डर केला होता. एका आठवड्यानंतर त्यांना ऑनलाईन पार्सल मिळालं पार्सल पोहोचल्यानंतर त्यांना खूपच आनंद झाला. पण पार्सल उघडताच त्यांना मोठा धक्का बसला. कारण  70 हजार 900 रुपयांच्या फोन ऐवजी ब़ॉक्समध्ये एक विम बार साबण आणि पाच रुपयाचं नाणे मिळालं. पण पोलिसाच्या मदतीने आता या व्यक्तीला अखेर फोनचे पैसे आता परत मिळाले आहे.

बॉक्समध्ये एक विम डिशवॉश बार आणि पाच रुपयांचं नाणं 

न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, नुरूल अमीन यांनी अ‍ॅमेझॉनवरुन 12 ऑक्टोबरला फोनची ऑर्डर केली होती. आपल्या अ‍ॅमेझॉनपे कार्डवरून पेमेंट केले होते. 15 ऑक्टोबरला पार्सल पोहोचले. डिलीव्हरी बॉयच्या समोर एक 'अनबॉक्सिंग' व्हिडियो बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बॉक्समध्ये फक्त एक विम डिशवॉश बार आणि पाच रुपयांचं नाणं मिळालं. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होता. त्यावेळी तपासादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

झारखंडमध्ये 25 सप्टेंबरपासून फोनचा होत होता वापर 

तपास सुरू केल्यानंतर उघड झाले की, जो फोन बुक करण्यात आला होता. तो यावर्षी सप्टेंबर पासून झारखंडमध्ये कोणाकडून तरी वापरला जात होता. पोलिसांनी कव्हरवर मिळालेल्या आयएमईआय नंबरच्या तपासावरून हा खुलासा झाला. आम्ही अ‍ॅमेझॉन अधिकारी आणि तेलंगाना स्थित विक्रेत्याशी संपर्क केला. झारखंडमध्ये 25 सप्टेंबर पासून फोनचा वापर होत होता. ऑर्डर ऑक्टोबरमध्ये दिली होती. फोनचा स्टॉक नव्हता, असे विक्रेत्यांनी सांगितले. नुरूलचे पैसे परत दिले जातील, असं विक्रेत्याने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनonlineऑनलाइन