शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार्बन टिटानियम जंबो स्मार्टफोन दाखल

By शेखर पाटील | Updated: October 25, 2017 08:11 IST

कार्बन कंपनीने आपल्या टिटानियम या मालिकेतील टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ६,४९० रूपये मूल्यात सादर केला आहे.

ठळक मुद्देकार्बन कंपनीने आपल्या टिटानियम या मालिकेतील टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ६,४९० रूपये मूल्यात सादर केला आहे.मध्यंतरी चीनी कंपन्यांच्या झंझावातामुळे भारतीय कंपन्या गलीतगात्र झाल्याचे चित्र होते. मात्र अलीकडेच एंट्री लेव्हल या प्रकारात पुन्हा एकदा भारतीय कंपन्यांनी पकड घेतल्याचे दिसून येत आहे.

कार्बन कंपनीने आपल्या टिटानियम या मालिकेतील टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ६,४९० रूपये मूल्यात सादर केला आहे.

मध्यंतरी चीनी कंपन्यांच्या झंझावातामुळे भारतीय कंपन्या गलीतगात्र झाल्याचे चित्र होते. मात्र अलीकडेच एंट्री लेव्हल या प्रकारात पुन्हा एकदा भारतीय कंपन्यांनी पकड घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषत: मायक्रोमॅक्सने अनुक्रमे बीएसएनएल आणि व्होडाफोनसोबत भारत १ आणि भारत १ अल्ट्रा तर कार्बनने एयरटेलसोबत कार्बन ४० हे मॉडेल सादर करून जिओफोनला तगडे आव्हान दिले आहे. या सर्व गदारोळात कार्बन टिटानियम जंबो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून  ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १६ तासांपर्यंत चालत असल्याचा कार्बनचा दावा आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, कार्बन टिटानियम जंबो या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून याचा युजर्सला उपयोग होऊ शकतो. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी ओटीजी आदी फिचर्स असतील. कार्बन टिटानियम जंबो हे मॉडेल भारतीय ग्राहकांना ब्लॅक आणि शँपेन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल