शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कॅस्परस्कीचा मोफत अँटी व्हायरस

By शेखर पाटील | Updated: July 31, 2017 18:15 IST

संगणक सुरक्षेतील आघाडीचे नाव असणार्‍या कॅस्परस्की लॅब या कंपनीने जगभरातील संगणक युजर्ससाठी मोफत अँटी व्हायरस देण्याची घोषणा केली आहे.

संगणक सुरक्षेतील आघाडीचे नाव असणार्‍या कॅस्परस्की लॅब या कंपनीने जगभरातील संगणक युजर्ससाठी मोफत अँटी व्हायरस देण्याची घोषणा केली आहे.

अँटी व्हायरस हा आपल्या डिजीटल आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. संगणकापासून ते विविध स्मार्ट उपकरणांमध्ये याचा वापर आपण करत असतो. सध्या अनेक मोफत तसेच व्यावसायिक पातळीवरील अँटी व्हायरस उपलब्ध आहेत. यात आता कॅस्परस्की या रशियन कंपनीने मोफत अँटी व्हायरस देण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीचे संस्थापक तथा सीईओ युजीन कॅस्परस्की यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. कॅस्परस्की फ्री या नावाने हा मोफत अँटी व्हायरस वापरता येणार आहे. यात संगणकातील माहितीला स्कॅन करण्यासह याला सुरक्षा कवच प्रदान करण्याची सुविधा असेल. अन्य प्रिमीयम अँटी व्हायरस सॉफ्टवेअर्सप्रमाणे यात आधुनीक (उदा. ऑनलाईन पेमेंट प्रोटेक्शन, व्हीपीएन आदी) फिचर्स नसले तरी प्राथमिक पातळीवरील वापरासाठी तो उपयुक्त आहे. विशेष करून अनेक स्पायवेअर्स चोरट्या मार्गाने संगणकात प्रवेश करून गोपनीय माहिती चोरत असून त्यांना अटकाव करण्याचे काम तो करू शकतो. सध्या रशियासह काही राष्ट्रांमधील युजर्स याला मोफत डाऊनलोड करून वापरू शकतात. २५ जुलै रोजी कॅस्परस्की लॅबच्या स्थापनेस २० वर्षे झाल्याप्रित्यर्थ आता जगातल्या अन्य देशांमधील युजर्सला क्रमाक्रमाने याचे डाउनलोड उपलब्ध करण्यात येत आहे. भारतात सप्टेंबर महिन्यात ही सुविधा मिळणार असल्याचे कॅस्परस्की कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे भारतीय युजर्स सप्टेंबर महिन्यातच याचा वापर करू शकतील.

मात्र काही अमेरिकन तज्ज्ञांनी कॅस्परस्की कंपनी त्यांच्या प्रत्येक युजरची गोपनीय माहिती रशियन सरकारला देत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे संगणक हॅक करण्यापासून ते त्यातील माहितीचा गैरवापर होण्याचे प्रकार होतात असा ठपकादेखील ठेवण्यात आला आहे. अर्थात अमेरिका आणि रशियातील वर्चस्वाचा वाद पाहता असल्या स्वरूपाचे आरोप हे आधीपासूनच करण्यात येत असल्याची बाबही तितकीच खरी आहे.  यामुळे हा प्राथमिक स्वरूपाचा हा अँटी व्हायरस वापरणे तसे धोक्याचे नसल्याचेही जगातील अन्य तज्ज्ञांचे मत आहे.