शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अॅमेझॉनच्या इको उपकरणांवर जंबो डिस्काऊंट

By शेखर पाटील | Updated: November 14, 2017 13:54 IST

अ‍ॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

अ‍ॅमेझॉनने गेल्या महिन्यात सादर केलेल्या अमेझॉन इको, इको प्लस आणि इको डॉट हे तिन्ही स्मार्ट स्पीकर आता सवलतीच्या दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत अॅमेझॉन इको, अॅमेझॉन इको प्लस आणि अॅमेझॉन इको डॉट हे स्मार्ट स्पीकर्स अनुक्रमे ९,९९९; १४,९९९ आणि ४,४९९ रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच याची प्रत्यक्षात विक्री सुरू झाली आहे. मात्र आता हे तिन्ही उपकरणे अनुक्रमे ६,९९९; १०,४९९ आणि ३,१९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात यात ३०००, ४५०० आणि १८०० रूपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याचे कोणतेही कारण अमेझॉनने दिलेले नाही. तसेच ही ऑफर मर्यादीत काळासाठी आहे का? याचा खुलासादेखील केलेला नाही.अॅमेझॉन कंपनीचा इको म्हणजे लंब गोलाकार आकार असणारा आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असणारा स्मार्ट स्पीकर आहे. यात भोवतीचा आवाज ऐकण्यासाठी संवेदनशील मायक्रोफोन लावण्यात आला आहे. हा घरात कुठेही ठेवला तरी भोवतीचे आवाज ऐकतो. त्याला अलेक्झा असे संबोधन करून कोणतीही आज्ञावली दिल्यानंतर तो त्याचे पालन करतो. कुणीही त्याला आपल्याला हवे ते संगीत वा गीत ऐकण्याची फर्माईश केल्यानंतर तो अमेझॉनवरील संबंधीत गाणे ऐकवतो. कुणी त्याला हवामानाची माहिती वा बातम्या विचारू शकतात. कुणी त्याला कोणताही शब्दाचा अर्थ वा विकीपेडियावरील माहिती विचारल्यानंतर तो संबंधीत व्यक्तीला ती माहिती ऐकवतो. याला घरातील अन्य स्मार्ट उपकरणे कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. तसेच हे स्मार्ट स्पीकर वाय-फायच्या मदतीने यासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपशी जोडता येतात.अमेझॉन इको प्लस या स्मार्ट स्पीकरमध्ये डॉल्बी प्रोसेसींग या तंत्रज्ञानाने सज्ज असणार्‍या ३६० अंशातील ध्वनीची जोड देण्यात आली आहे. यात घरातील स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करण्याची प्रणाली देण्यात आली आहे. तर अमेझॉन इको डॉट हे मॉडेल या तिन्हींमध्ये आकारने अत्यंत आटोपशीर असेच आहे. एका अर्थाने ही मूळ मॉडेलची मिनी आवृत्ती आहे. आकाराने लहान असल्यामुळे तो कुठेही सहजपणे वापरता येतो.

टॅग्स :amazonअॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान