शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला! रिसर्चरमुळे IRCTC वरील बुकिंग हॅक होण्यापासून वाचल्या; आधी केलेल्या बुकिंगच्या सुरक्षेवर अजूनही प्रश्नचिन्ह

By सिद्धेश जाधव | Updated: September 16, 2021 17:35 IST

IRCTC Vulnerbility exposed: IRCTC वेबसाईटवरील एका मोठ्या त्रुटीचा शोध एका सिक्योरिटी रिसर्चरने लावला आहे. या त्रुटींचा वापर करून कोणत्याची युजरची तिकीट कॅन्सल केली जाऊ शकत होती.

IRCTC च्या वेबसाईटवरील एका मोठ्या समस्येचा खुलासा झाला आहे. एका सिक्योरिटी रिसर्चरने या समस्येची माहिती इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ला दिली आहे. या रिसर्चरचे नाव रंगनाथन पी असे आहे, जे एक स्वतंत्र सिक्योरिटी रिसर्चर आहेत. IRCTC वेबसाईटवरील या त्रुटीचा वापर करून लाखो प्रवाश्यांची खाजगी माहिती हॅकर्स सहज अ‍ॅक्सेस करू शकत होते. प्रवाश्यांची खाजगी माहिती मिळवण्याचा हा छुपा मार्ग होता जणू, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.  

रंगनाथन यांनी 30 ऑगस्ट 2021 रोजी ईमेलद्वारे या गडबडीची माहिती CERT-IN दिली होती. आयआरसीटीसीने 4 सप्टेंबरला ही समस्या सोडवली आणि 11 सप्टेंबरला याची माहिती दिली. परंतु वेबसाईटवर हा दोष कधीपासून अस्तित्वात होता हे मात्र समजले नाही. या काळात प्रवाशांच्या डेटाशी कोणती छेडछाड झाली आहे कि नाही हे देखील स्पष्ट झाले नाही.  

आयआरसीटीसीमधील या दोषामुळे फक्त युजर्सच्या खाजगी माहितीला धोका नव्हता तर या द्वारे हॅकर्स बुक केलेल्या तिकीटाची माहिती देखील बदलता येत होती. हॅकर्स बुक केलेले कोणतेही तिकीट कॅन्सल करू शकत होते तसेच बोर्डिंग स्टेशन बदलणे, जेवणाची ऑर्डर, हॉटेल बुकिंग, टूरिस्ट पॅकेज आणि बस बुकिंग देखील बदलता येत होती, असे रंगनाथन यांनी TOI ला सांगितले आहे.  

रंगनाथन यांनी आतापर्यंत LinkedIn, UN, BYJU, Nike, Lenove आणि Upstox च्या वेब अ‍ॅप्लिकेशनमधील दोष निदर्शनास आणून दिले आहेत. सामान्य प्रवाश्याप्रमाणे तिकीट बुक करत असताना त्यांना टेस्टिंग करण्याचा विचार आला आणि त्यांना हा दोष सापडला.  

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसी