शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंटेक्सचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: December 13, 2017 12:34 IST

इंटेक्स कंपनीने ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा इएलवायटी इ६ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देअलीकडे बहुतांश कंपन्या ग्राहकांची आवश्यकता लक्षात घेत चांगली बॅटरी असणारे स्मार्टफोन सादर करत आहेत. यात आता इंटेक्स कंपनीच्या इएलवायटी इ६ या मॉडेलची भर पडली आहे. बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती मल्टी-टास्कींग करूनदेखील दीर्घ काळापर्यंत चालत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

अलीकडे बहुतांश कंपन्या ग्राहकांची आवश्यकता लक्षात घेत चांगली बॅटरी असणारे स्मार्टफोन सादर करत आहेत. यात आता इंटेक्स कंपनीच्या इएलवायटी इ६ या मॉडेलची भर पडली आहे. वर नमूद केल्यानुसार यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती मल्टी-टास्कींग करूनदेखील दीर्घ काळापर्यंत चालत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याच्या माध्यमातून वापरानुसार ८ ते १६ तासांइतका बॅकअप तर १२ दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.

इंटेक्स इएलवायटी इ६ या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा व एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) २.५ डी डिस्प्ले देण्यात आला असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. मीडियाटेकच्या क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. याचे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून दोन्ही बाजूने एलईडी फ्लॅश देण्यात आलेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. इंटेक्स इएलवायटी इ६ हा स्मार्टफोन ग्राहकांना ६,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला असून १५ डिसेंबरपासून याची फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून विक्री सुरू होणार आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल