शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

इंटेक्स अ‍ॅक्वा लायन्स २ : जाणून घ्या काय आहेत फिचर्स ?

By शेखर पाटील | Updated: September 22, 2017 21:00 IST

इंटेक्स कंपनीने आपला अ‍ॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अ‍ॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे

ठळक मुद्देयात झेंडर आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ हे अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेतयात डाटाबॅक हे अ‍ॅप असून, महिन्याला ५०० मेगाबाईट इतका डाटा ग्राहकाला वापरता येणार आहेअ‍ॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच

इंटेक्स कंपनीने आपला अ‍ॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अ‍ॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वॉड-कोअर प्रोसेसरने युक्त असणारा हा स्मार्टफोन १ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या सुविधेसोबत ग्राहकांना मिळणार आहे. यातील स्टोअरेज हे मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. अँड्रॉईडच्या ७.० नोगट प्रणालीवर चालणारा हा स्मार्टफोन २,४०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. यात अनुक्रमे ५ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे मुख्य आणि समोरचे कॅमेरे देण्यात आले आहेत.

इंटेक्स अ‍ॅक्वा लायन थ्री-जी स्मार्टफोनमध्ये ड्युअल सीम, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, जी-सेन्सर, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी पोर्ट आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. तर यात झेंडर आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ हे अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. यात डाटाबॅक हे अ‍ॅपही देण्यात आले असून याच्या माध्यमातून महिन्याला ५०० मेगाबाईट इतका डाटा ग्राहकाला वापरता येणार आहे. हा स्मार्टफोन सध्या ऑफलाईन पध्दतीने देशभरातील शाॅपीजमधून उपलब्ध करण्यात आला असून लवकरच ऑनलाईन शॉपींग पोर्टल्सवरूनही मिळणार असल्याचे इंटेक्स कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल