शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इंटेक्सचा खास सेल्फी प्रेमींसाठी स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 19:16 IST

इंटेक्स कंपनीने उत्तम दर्जाची सेल्फी काढण्यास सक्षम असणारा अ‍ॅक्वा सेल्फी हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करत असल्याची घोषणा केली आहे.

इंटेक्स कंपनीने उत्तम दर्जाची सेल्फी काढण्यास सक्षम असणारा अ‍ॅक्वा सेल्फी हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करत असल्याची घोषणा केली आहे.

इंटेक्स अ‍ॅक्वा सेल्फी या मॉडेलमध्ये ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. खरं तर यापेक्षा अनेक मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे असतात. मात्र या मॉडेलमधील फ्रंट कॅमेर्‍यात एलईडी फ्लॅश प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा काढता येतील असा दावा कंपनीने केला आहे. तर या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा आठ मेगापिक्सल्सचा असून यातही एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. उर्वरीत फिचर्सचा विचार करता, या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. १.३ गेगाहर्टस क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असलेल्या या मॉडेलची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची लिथियम आयन बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स देण्यात आले आहेत. 

इंटेक्स अ‍ॅक्वा सेल्फीमध्ये काही विशेष फिचर्सही आहेत. यात इनबिल्ट क्युआर कोड स्कॅनरचा समावेश आहे. यामुळे कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप न वापरता क्युआर कोड स्कॅन करणे सहजशक्य आहे. तसेच यात लोकप्रिय म्युझिक स्ट्रीमिंग म्हणून ख्यात असणारे गाना हे अ‍ॅपही प्रिलोडेड अवस्थेत असेल. इंटेक्स अ‍ॅक्वा सेल्फी हे मॉडेल ६,६४९ रूपये मुल्यात लाँच करण्यात आले असून ते ग्राहकांना रोझ गोल्ड आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.