शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

या फोनवर टिकणार नाहीत रोगांचे सूक्ष्मजंतू; 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला हटके स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Updated: April 27, 2022 17:52 IST

कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे.

Infinix नं भारतात एक हटके स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे. या स्मार्टफोनच्या पॅनलवर सुक्षजंतू टिकणार नाहीत यासाठी सिल्व्हर ऑयन स्प्रे करण्यात आला आहे.  

Infinix Smart 6 ची किंमत 

एंट्री लेव्हल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये 64GB मेमरी असलेला हा एकमेव डिवाइस असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. पोलर ब्लॅक, हार्ट ऑफ ओशियन, लाईट सी ग्रीन आणि स्टारी पर्पल असे कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. हा हँडसेट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Infinix Smart 6 चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 226PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. डिवाइस Android 11 Go Edition वर चालतो.   प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो. कंपनीनं 2GB वर्चुअल रॅम देखील दिला आहे. मेमरी देखील 512GB पर्यंत मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8MP चा मुख्य कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक ड्युअल सिम 4G फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 6 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान