शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

48MP च्या जबराट कॅमेऱ्यासह बजेट फ्रेंडली फोन Infinix Note 11i लाँच; जाणून घ्या किंमत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 16:38 IST

Budget Phone Infinix Note11i Price And Details: Infinix Note 11i स्मार्टफोन जागतिक बाजारात Helio G85 चिपसेट, 48MP triple camera, 4GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.

Infinix ने काही दिवसांपूर्वी आपली ‘नोट 11’ सीरीज जागतिक बाजारात उतरवली होती. या सीरिजमध्ये Infinix Note 11, Infinix Note 11 Pro आणि Infinix Note 11s असे तीन स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. त्यात आता Infinix Note 11i ची भर कंपनीने घातली आहे. हा फोन Helio G85 चिपसेट, 48MP triple camera, 4GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.  

Infinix Note 11i ची किंमत 

Infinix Note 11i  स्मार्टफोन सध्या नायजेरियात लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा भारतासह जगभरातील अन्य देशांमध्ये देखील उपलब्ध होईल. या फोनची किंमत 160 अमेरिकन डॉलर ठेवण्यात आली आहे, ही किंमत भारतीय चलनात 11,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.  

Infinix Note 11i 

इनफिनिक्स नोट 11आय मध्ये 6.95 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 180Hz टच सेपलिंग रेटला सपोर्ट करतो. या इनफिनिक्स फोनमध्ये ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा डिवाइस अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित एक्सओएस 7.6 युआयवर चालतो. 

Infinix Note 11i एक ड्युअल सिम फोन आहे, जो 4जी वोएलटीई, 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह बाजारात आला आहे. फोनयामध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. पॉवर बॅकअपसाठी इनफिनिक्स नोट 11आय मध्ये 5,000एमएएचची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात क्वॉड एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यह इनफिनिक्स फोन 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.