शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

भारत बनणार Ai हब! 'या' शहरात सुरू होणार ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे पहिले ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:17 IST

OpenAI लवकरच भारतात आपले पहिले ऑफिस सुरू करणार आहे; यासाठी भरतीही सुरू झाली आहे.

आयटी कंपन्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही दशकांमध्ये अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये आपले ऑफिस सुरू केले आहे. यामध्ये हजारो भारतीय काम करतात. यामध्ये ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI ची भर पडणार आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत आपले पहिले ऑफिस उघडणार आहे. 

भारतात आपले पहिले ऑफिस उघडण्यामागील कारण म्हणजे, ओपनएआय आता आपली उपस्थिती आणखी मजबूत करू इच्छिते. कंपनीसाठी भारत एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. भारतात उघडल्या जाणाऱ्या या नवीन ऑफिससाठी स्थानिक टीम नियुक्त करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. OpenAI ची ही नवीन टीम स्थानिक भागीदार, सरकार, विकासक, व्यावसायिक कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

भारतात उत्तम प्रतिभा ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, भारतात Ai साठी अविश्वसनीय संधी आहे. जागतिक एआय लीडर बनण्यासाठी भारतात सर्व आवश्यक घटक आहेत, जसे की अद्भुत तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे डेव्हलपर इकोसिस्टम आणि इंडियाएआय मिशनद्वारे मजबूत सरकारी पाठिंबा. देशभरात एआय अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पहिले पाऊल आहे आणि भारतासाठी आणि भारतासोबत एआय तयार करण्याची आमची वचनबद्धता आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले...केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतात कंपनी स्थापन करण्याचा ओपनएआयचा निर्णय डिजिटल नवोन्मेष आणि एआय स्वीकारण्यात देशाच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, एआय प्रतिभा आणि एंटरप्राइझ स्केल सोल्यूशन्समध्ये मजबूत गुंतवणूकीसह, भारत एआय परिवर्तनाच्या पुढील लाटेला चालना देण्यासाठी अद्वितीय स्थितीत आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत एआयचे फायदे पोहोचवण्यासाठी या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी ओपनएआयच्या भागीदारीचे आम्ही स्वागत करतो.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सdelhiदिल्लीtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक