शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Sony चा दावा, DSLR कॅमेऱ्याला विसरतील लोक, स्मार्टफोनची फोटो क्वॉलिटी असेल एक नंबर 

By सिद्धेश जाधव | Updated: June 14, 2022 16:22 IST

येत्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर DSLR कॅमेऱ्याला देखील मागे टाकेल, असा दावा Sony नं केला आहे. 

Sony कंपनी आपल्या डिव्हाइसेसच्या क्वॉलिटीसाठी ओळखली जाते. कंपनीचे स्मार्टफोन, टीव्ही, ऑडिओ प्रोडक्ट आणि प्रोफेशनल कॅमेऱ्यांचं युजर्सकडून तोंडभरून कौतुक केलं जातं. आता जरी कंपनी स्मार्टफोन सेगमेंट सक्रिय नसली तरी कंपनीनं बनवलेल्या कॅमेरा सेन्सरचा वापर अनेक प्रीमियम फोन्समध्ये केला जातो. ज्यात Xiaomi, OnePlus सारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, Sony नं दावा केला आहे की, येत्या काही वर्षांत स्मार्टफोनचा कॅमेरा सेन्सर प्रोफेशनल DSLR कॅमेऱ्याला मागे टाकेल. स्मार्टफोनमधून देखील चांगल्या क्वॉलिटीचे फोटो क्लीक करता येतील.  

Nikkei च्या रिपोर्टनुसार, Sony Semiconductor Solutions (SSS) चे CEO आणि प्रेसिडेंट Terushi Shimizu यांनी म्हटलं आहे की, “सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेऱ्यातून घेतलेल्या फोटोच्या क्वॉलिटीला स्टिल इमेज काही वर्षांमध्ये रिप्लेस करेल.” कंपनीच्या 2024 च्या रोडमॅपच्या प्रजेंटेशनमध्ये सांगण्यात की, Sony चे स्मार्टफोन ILC इमेज क्वॉलिटीला मागे टाकतील.  

DSLR के मुकाबले बेहतर होगा स्मार्टफोन कॅमेरा 

येत्या काही वर्षांमध्ये कमी सेन्सर असलेला कॅमेरा जास्त लाईटसह फोटो क्लिक करू शकतील. परंतु हे कॅमेरा सेन्सर DSLR मधील APS-C कॅमेऱ्याची जागा घेतील की नाही, ते पाहावं लागेल. विशेष म्हणजे Sony च्या फ्लॅगशिप मिररलेस कॅमेऱ्यात या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ लागला आहे, त्यामुळे कंपनीचा दावा खरा होऊ शकतो.  कंपनी आपल्या AI प्रोसेसिंग क्षमता देखील सुधारण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे मल्टी फ्रेम HDR, लाँग रेंज झूम आणि हाय क्वॉलिटी व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.   

Sony व्यतिरिक्त Samsung देखील स्मार्टफोन कॅमेरा टेक्नॉलॉजीवर खूप काम करत आहे. दक्षिण कोरियन कंपनीनं सर्वात पहिला 108MP चा कॅमेरा सेन्सर लाँच केला होता. तसेच 200MP चा कॅमेरा सेन्सर सादर करणार देखील ही पहिली कंपनी आहे. परंतु DSLR च्या तोडीचा कॅमेरा सेन्सर कोण सादर करतं, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन