शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

हुआवे कंपनीचा ऑनर हॉली ४ स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: October 4, 2017 17:02 IST

हुआवे कंपनीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतात आपला ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

हुआवे कंपनीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतात आपला ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ग्रे, गोल्ड आणि सिल्व्हर या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा असेल. यात प्रो व्हिडीओ, प्रो पिक्चर, टाईमलॅप्स, स्लो-मोशन आदी फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ऑनर हॉली ४ हे मॉडेल अँड्रॉडइच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर आधारित असणार्‍या इएमयुआय ५.१ प्रणालीवर चालणारा असेल. तर यातील बॅटरी ३०२० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.

ऑनर हॉली ४ या स्मार्टफोनमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Mobileमोबाइल