शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

दिसणार नाही सेल्फी कॅमेरा पण झक्कास सेल्फी क्लीक होणार; लाँच झाला धमाल फोन  

By सिद्धेश जाधव | Updated: January 31, 2022 15:32 IST

Huawei Nova Y9a: Huawei Nova Y9a मध्ये 8GB RAM, 128GB स्टोरेज, 64MP कॅमेरा आणि Pop Selfie Camera देण्यात आला आहे.

Huawei आपला नवीन आणि हटके स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीचा हा फोन Huawei Nova Y9a नावानं सादर करण्यात आला आहे. या फोनची खासियत म्हणजे यात मिळणारा पॉपअप सेल्फी कॅमेरा. जो स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये लपून राहतो आणि सेल्फीची कमांड देताच हा कॅमेरा पॉप होतो. यामुळे डिस्प्लेवर मात्र कोणतीही नॉच किंवा होल दिसत नाही.  

Huawei Nova Y9a चे स्पेसिफिकेशन्स 

हुवावे नोवा वाय9ए स्मार्टफोनमध्ये 6.63 इंचाच फुलएचडी+ डिस्प्ले एलसीडी देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड आधारित ईएमयुआय 10.1 वर चालतो. परंतु गुगल अ‍ॅप्स मिळत नाहीत त्याऐवजी एचएमएस सपोर्ट मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा वाय9ए स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी यातील 4,300mAh ची बॅटरी 40वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Huawei Nova Y9a ची किंमत 

Huawei Nova Y9a सध्या दक्षिण आफ्रिकेत 6,499 ZAR (सुमारे 30,000 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन Midnight Black, Sakura Pink आणि Space Silver कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या जागतिक लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.  

हे देखील वाचा:

भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :huaweiहुआवेSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान