शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

एचटीसी यु ११ ची सफायर ब्ल्यू आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 19:28 IST

एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यु ११ या स्मार्टफोनची सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून कंपनीच्या ई-स्टोअरवर याची नोंदणी सुरू झाली आहे.

एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यु ११ या स्मार्टफोनची सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून कंपनीच्या ई-स्टोअरवर याची नोंदणी सुरू झाली आहे.

गेल्या महिन्यात एचटीसी यु ११ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी ५१,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आला होता. ग्राहकांना चंदेरी आणि काळा या दोन रंगांमध्ये एचटीसी यु ११ खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला होता. यात आता सफायर ब्ल्यू या रंगाचा नवीन पर्याय सादर करण्यात आला आहे.  एचटीसी कंपनीच्या ई-स्टोअरवरून याची अगावू नोंदणी सुरू झाली असून ३० जुलैपासून ग्राहकांना हे मॉडेल प्रत्यक्षात खरेदी करता येईल. यातील उर्वरित फिचर्स हे आधीप्रमाणेच असतील. अर्थात यात ५.५ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी (११४० बाय २५६० पिक्सल्स) क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. क्वॉलकॉम ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६३५ या अद्ययावत प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम सहा जीबी रॅम तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबी इतके वाढवता येईल. 

एचटीसी यु ११ हे सेल्फी स्पेशल कॅमेर्‍याने सज्ज मॉडेल आहे. उत्तम दर्जाचे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तर यातील रिअर कॅमेरा १२ अल्ट्रापिक्सल्स क्षमतेचा असेल. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. यामध्ये थ्री-डी साऊंड प्रणाली देण्यात आली असून याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभूती शक्य आहे. 

एचटीसी यु ११ या मॉडेलमध्ये नाविन्यपूर्ण एज सेन्सर ही प्रणाली देण्यात आली आहे. याच्या मदतीने टचस्क्रीन डिस्प्लेस स्पर्श न करतांनाही फक्त कडांना हाताने दाबून फोटो काढणे, कोणतेही अ‍ॅप कार्यान्वित करणे तसेच टेक्स्ट अथवा व्हॉईस मॅसेज पाठवता येतात. अर्थात हा स्मार्टफोन अतिशय सुलभपणे वापरता येतो.