शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा

By शेखर पाटील | Updated: January 5, 2018 11:03 IST

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपले ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य २९,९९९ रूपये इतके असेल.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपले ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य २९,९९९ रूपये इतके असेल. हुआवे कंपनीने चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात ऑनर व्ही १० हा स्मार्टफोन सादर केला होता. आता यालाच ऑनर व्ह्यू १० या नावाने भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. याचे मूळ मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले होते. यातील ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट ग्राहकांना मिळणार आहे.ऑनर व्ह्यू १० या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस अर्थात २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर किरीन ९७० प्रोसेसर असेल. तर वर नमूद केल्यानुसार याची रॅम ६ जीबी व स्टोअरेज १२८ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. फास्ट चार्जींग सपोर्टसह यात ३७५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर व्ह्यू १० या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश, पीडीएएफ आणि एफ/१.८ अपार्चरसह २० आणि १६ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असतील. यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रतिमांसह फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ आवृत्तीवर आधारित इएमयुआय ८.० या युजर इंटरफेसवर चालणारा असेल. नेव्ही ब्ल्यू आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन ८ जानेवारीपासून अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.ऑनर व्ह्यू १० मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी टाईप-सी, एनएफसी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स आहेत. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल