शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ऑनर व्ही 10 : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Updated: November 29, 2017 12:15 IST

ऑनर कंपनीने आपल्या ऑनर व्ही १० या फ्लॅगशीप मॉडेलची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरच्या व्ही 10 या मॉडेलची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून होती. अखेर याला अधिकृतपणे बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज, ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. ब्लॅक, अरोरा ब्ल्यु, गोल्ड आणि रेड या चार रंगांमध्ये हा स्मार्टफोन पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध होणार असून लवकरच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.

ऑनर व्ही १० या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस अर्थात २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर किरीन ९७० प्रोसेसर असेल. तर याच्या तिन्ही आवृत्त्यांमधील स्टोअरेज २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. फास्ट चार्जिंग सपोर्टसह यात ३७५० मिलीअॅम्पिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर व्ही १०च्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश, पीडीएएफ आणि एफ/१.८ अपार्चरसह २० आणि १६ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील.

यातून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ आवृत्तीवर आधारित इएमयुआय ८.० या युजर इंटरफेसवर चालणारा असेल. याच्या तिन्ही आवृत्त्यांचे मूल्य भारतीय चलनानुसार २६ ते ३४ हजारांच्या दरम्यान आहे. भारतात मात्र ते यापेक्षा कमी असू शकेल, असे मानले जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल