शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

भारतात लवकरच मिळणार ४ कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा हा स्मार्टफोन !

By शेखर पाटील | Updated: January 11, 2018 12:06 IST

ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

ऑनरने आपला ऑनर ९ लाईट हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात फ्रंट आणि बॅक या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन म्हणजे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत.

अलीकडच्या काळात ड्युअल कॅमेरा सेटअप हा प्रकार प्रचलीत झाला आहे. अनेक स्मार्टफोनच्या मागली बाजूस वा फ्रंट साईडला या प्रकारचे दोन कॅमेरे दिलेले असतात. तर आता डबल ड्युअल कॅमेरा सेटअप अर्थात पुढे व मागे या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन कॅमेरे असणारे काही स्मार्टफोनदेखील बाजारपेठेत दाखल होत आहेत. या अनुषंगाने हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने ऑनर ९ लाईट या चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणार्‍या स्मार्टफोनचा टिझर लाँच केला असून हे मॉडेल येत्या काही दिवसात भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे.

ऑनर ९ लाईट या मॉडेलमध्ये एकंदरीत चार कॅमेरे आहेत. यात मागील बाजूस एक कॅमेरा १३ तर दुसरा २ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यात ऑटो-फोकस, फेज डिटेक्शन, एलईडी फ्लॅश आदी फिचर्स देण्यात आले आहेत. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठीही यात १६ व २ मेगापिक्सल्स क्षमतांचे फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये एचडी व्हिडीओ रेकॉर्डींगची सुविधा देण्यात आलेली आहे.

ऑनर ९ लाईट या मॉडेलमध्ये १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा ५.६५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टा कोअर किरीन ६५९ प्रोसेसरने सज्ज असणारा हा स्मार्टफोन चीनमध्ये तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. यातील भारतात नेमके कोणते व्हेरियंट सादर होईल हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, ४ जीबी रॅम व इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असणारे मॉडेल सादर होण्याची शक्यता आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा यात असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर हुवे कंपनीचा इएमयुआय ८.० हा युजर इंटरफेस असेल. तर यात फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. हे मॉडेल महिनाअखेरीस भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल