शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनर 8 लाईट झाला स्वस्त : जाणून घ्या मूल्य आणि फीचर्स

By शेखर पाटील | Updated: November 24, 2017 12:18 IST

हुआवे कंपनीने आपल्या ऑनर ८ लाईट या स्मार्टफोनच्या मूल्यात २ हजार रूपयांची कपात केली असून आता हे मॉडेल ग्राहकांना १५,९९९ रूपयात मिळणार आहे.

हुआवेचा ब्रँड असणार्‍या ऑनरने या वर्षीच्या मे महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी आपले ऑनर ८ लाईट हे मॉडेल १७,९९९ रूपये किंमतीत लाँच केले होते. यात आता दोन हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी आता हा स्मार्टफोन ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये १५,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे.

ऑनर ८ लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले असेल. यात हुआवेचा हायसिलीकॉन किरीन ६३५ प्रोसेसर असेल. याची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यात १२ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ७७ अंशाच्या लेन्ससह ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. याच्या मुख्य कॅमेर्‍यामध्ये ऑटो-फोकस, कंटिन्युअस शुटींग, डिजिटल झूम, जिओटॅगींग, पॅनोरामा, एचडीआर, टचफोकस, फेस डिटेक्शन, व्हाईट बॅलन्स सेटींग, सीन मोड, आयएसओ सेटींग आणि पीडीएएफ आदी फीचर्स देण्यात आले आहेत.

ऑनर ८ लाईट हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या प्रणालीवर चालणारा असून यावर कंपनीचा इएमयुआय ५.० लाईट युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तर यात ३,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची लिथियम-पॉलिमर आयन बॅटरी असेल. जी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल २१ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फीचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल