शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो २- केपे येथे शिक्षकांना मार्गदर्शन

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

सावर्डे : केपे गट सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बोरीमळ-केपे येथे झालेल्या इंग्रजी व गणित कार्यशाळेत तालुक्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रकांच्या माध्यमातून विषय सोपे करून शिकविणे या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश होता.

सावर्डे : केपे गट सर्व शिक्षा अभियान कार्यालयातर्फे चार दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बोरीमळ-केपे येथे झालेल्या इंग्रजी व गणित कार्यशाळेत तालुक्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांनी सहभाग घेतला. इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रकांच्या माध्यमातून विषय सोपे करून शिकविणे या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश होता.
निवृत्त मुख्याध्यापक तथा अभियानाचे प्रशिक्षक विठ्ठल आवदियेकर म्हणाले, स्थानिक भाष्यांच्या आधारे इंग्रजीचा अभ्यास अधिक उपयुक्त ठरतो. इंग्रजी शिकण्यासंदर्भातील दृष्टिकोन नेहमी व्यवहार्य असावा. विद्यार्थ्यांमधील विचार प्रक्रिया ही मातृभाषेतून होत असते. त्यामुळे अन्य भाषा व विषय शिकणे सोयीस्कर होते. तसेच प्राथमिक स्तरावर मुलांचे भाषेतील कच्चे दुवे हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते. तसेच प्रमाणित भाषा विद्यार्थ्यांना अवगत होणे जरूरीचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
कार्यशाळेत अभियानाचे प्रभाग प्रशिक्षक अर्चना वारीक भोसले, सीमा आवरोलकर, अनुराधा नाईक यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कृतिपत्रके (वर्कशिट्स) तयार करून वानगीदाखल प्रात्यक्षिके सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. समारोपप्रसंगी अभियानाच्या गट समन्वयक सीमा भेंडे यांनी मार्गदर्शन केले, तर गट प्रशिक्षक नम्रता जांबावलीकर यांनी आभार मानले. (लो. प्र.)