शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री गेमची घोषणा

By शेखर पाटील | Updated: May 1, 2018 11:17 IST

जॅम सिटी या कंपनीने मनोरंजनाच्या क्षेत्रातील आघाडीचे नाव असणार्‍या वॉर्नर ब्रदर्सच्या सहकार्याने हॅरी पॉटर्स : होगवॉट मिस्ट्री या नावाने नवीन गेम लाँच केला आहे.

जॅम सिटी या कंपनीने मनोरंजनाच्या क्षेत्रातील आघाडीचे नाव असणार्‍या वॉर्नर ब्रदर्सच्या सहकार्याने हॅरी पॉटर्स : होगवॉट मिस्ट्री या नावाने नवीन गेम लाँच केला आहे. हॅरी पॉटर मालिकेबाबत कुणाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ब्रिटनच्या जे. के. रोलिंग या लेखीकेने या मालिकेत लिहलेल्या पुस्तकांना जगभरात उदंड प्रतिसाद लाभला आहे. यावर आधारित चित्रपटांनीही रग्गड धंदा केला आहे. खरं तर हॅरी पॉटरशी संबंधीत अनेक स्मार्टफोन गेम्सदेखील आधीच उपलब्ध आहेत. यात आता हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री या नवीन गेमची भर पडणार आहे. हा गेम अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही ऑपरेटींग सिस्टीमच्या युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. हा गेम मोफत असला तरी, यात इन-अ‍ॅप परचेसींगची सुविधा आहे. अर्थात यातील हायर लेव्हलसाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत. 

हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री हा गेम खेळणार्‍यांना होगवॉट विचक्रॉफ्ट स्कूलमधील जादूई वातावरणाची अनुभूती घेता येणार आहे. यात युजर विविध प्रकारच्या जादूई ट्रिक्स शिकू शकेल. तसेच गेमरला हॉगवॉट स्कूलमधील विविध रहस्यांनी तुडूंब भरलेल्या प्राचीन दालनांमध्ये मुशाफिरी करता येणार आहे. येथे त्यांना अपप्रवृत्तींशी दोन-हात करण्याची संधीदेखील मिळणार आहे. यामध्ये विविध साहसांसाठी वेगवेगळ्या लेव्हल्स असणार आहेत. यात गेमरला स्वत:चा अवतार निवडण्यासह विविध पात्रे निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय गेमर आपल्याला हवा तो प्रोफेसर, मित्र, घर आदींना निवडू शकणार आहे. यासोबत मॅजिक स्पेल्स, पोझिशन्स आदींनाही निवडता येईल. अर्थात गेमरला या जादूई शाळेतील विद्यार्थी बनून अनेक चित्तथरारक बाबींना येथे अनुभवता येणार आहे. यामुळे हा गेम रोमांचकारी साहसाची आवड असणार्‍यांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. 

पाहा:- हॅरी पॉटर्स : होगवॉर्ट मिस्ट्री गेमचा ट्रेलर

अधिकृत संकेतस्थळ :-http://www.harrypotterhogwartsmystery.com

डाऊनलोड लिंक :-  https://play.google.com/store/apps/details?id=com.tinyco.potter&hl=en

टॅग्स :technologyतंत्रज्ञान