शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचा लवकरच टचस्क्रीनयुक्त स्मार्ट स्पीकर

By शेखर पाटील | Updated: October 25, 2017 12:28 IST

गल टचस्क्रीन डिस्प्ले असणारा स्मार्ट स्पीकर तयार असल्याचे सोर्स कोडद्वारे स्पष्ट झाले असून यात युट्युब प्ले-बॅकसह विविध उपयुक्त फिचर्स असतील. काही दिवसांपूर्वीच गुगल टचस्क्रीनने युक्त असणारा स्मार्ट स्पीकर तयार करणार असल्याची माहिती समोर आली होती.

ठळक मुद्देगुगल टचस्क्रीन डिस्प्ले असणारा स्मार्ट स्पीकर तयार असल्याचे सोर्स कोडद्वारे स्पष्ट झाले असून यात युट्युब प्ले-बॅकसह विविध उपयुक्त फिचर्स असतील. काही दिवसांपूर्वीच गुगल टचस्क्रीनने युक्त असणारा स्मार्ट स्पीकर तयार करणार असल्याची माहिती समोर आली होती.

गुगल टचस्क्रीन डिस्प्ले असणारा स्मार्ट स्पीकर तयार असल्याचे सोर्स कोडद्वारे स्पष्ट झाले असून यात युट्युब प्ले-बॅकसह विविध उपयुक्त फिचर्स असतील. काही दिवसांपूर्वीच गुगल टचस्क्रीनने युक्त असणारा स्मार्ट स्पीकर तयार करणार असल्याची माहिती समोर आली होती.

अँड्रॉइड पोलीस या टेक पोर्टलच्या ताज्या वृत्ताने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुगल च्या आगामी एपीके फाईलमधील अ‍ॅपच्या सोर्स कोडचे अध्ययन केले असता टचस्क्रीनयुक्त स्मार्ट स्पीकरची माहिती यात आढळून आल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे. यात क्वार्टझ या नावाने नवीन उपकरण येणार असल्याचे दिसून आले आहे. (याचे प्रयोगात्मक स्थितीतील सांकेतिक नाव प्रोजेक्ट मॅनहॅटन असल्याची माहिती आधी समोर आली होती.) यात या उपकरणाचे विविध मेन्यू आणि फिचर्सची माहितीदेखील यात देण्यात आली आहे. यानुसार यात ३२ विविध ऑन स्क्रीन आयकॉन्ससह हवामानाचे अलर्ट देण्यात येतील असे दिसून आले आहे. यात युट्युब प्लेबॅकचा सपोर्ट असेल. यावरून कुणीही वेब सर्फींग करू शकेल. तसेच यात बिझनेस लिस्टींग, फोटो गॅलरीज आणि गुगल  मॅप्सची सुविधाही यात असेल असे या वृत्तात म्हटले आहे. 

यात सात इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसंच यामध्ये अॅड्रॉइड आणि आयओएस या प्रणालींचा सपोर्ट असेल. याच्या मदतीने कंपन्या आपापले थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सदेखील तयार करू शकतील. विशेष म्हणजे यात गुगल नेस्टसारख्या स्मार्ट होम प्रणालींशी कनेक्ट होण्याची सुविधा असेल. यामुळे घरातील विविध स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करण्यासाठी हब म्हणून हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे.

अमेझॉन इको या उपकरणाला टक्कर देण्यासाठी गुगल या माध्यमातून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे सारे होत असतांना लिंकी या स्टार्टपने इनबिल्ट गुगल असिस्टंट असणारा याच प्रकारातील अर्थात टचस्क्रीन डिस्प्लेयुक्त स्मार्ट स्पीकर सादर केला आहे.