शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Google Maps वरून अशी डिलीट करा लोकेशन हिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:19 IST

गुगल मॅप्सचा वापर हा प्रामुख्याने लोकेशन शोधण्यासाठी केला जातो.

नवी दिल्ली - गुगल मॅप्सचा वापर हा प्रामुख्याने लोकेशन शोधण्यासाठी केला जातो. गुगलने काहीच दिवसांपूर्वी आपल्या नेव्हिगेशन सर्व्हिसमध्ये अनेक नवीन फीचर्स अ‍ॅड केले आहेत. प्रवास उत्तम व्हावा या हेतूने अनेक गोष्टी या सातत्याने अपडेट होत आहेत. गुगल मॅप्सचा वापर हा अनेकदा प्रवासादरम्यान आवर्जून केला जातो. युजर्सना मॅप्स वरील लोकेशन हिस्ट्री डिलीट करता येते. गुगल लोकेशन हिस्ट्री डिलीट करण्यासाठी दोन पर्याय देतं. पहिल्या पर्यायामध्ये 3 महिन्यांची हिस्ट्री तर दुसऱ्या पर्यायामध्ये 18 महिन्यांची हिस्ट्री ठेवून बाकीची हिस्ट्री आपोआप डिलीट करतं. 

Google Maps वरून लोकेशन हिस्ट्री डिलीट करण्यासाठी 'या' स्टेप्स करा फॉलो

- सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स ओपन करा. 

- तीन डॉट मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. 

- युअर टाईमलाईन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 

- युजर्सची टाईमलाईन ओपन होईल. त्यानंतर तीन डॉटवर क्लिक करा.

- क्लिक केल्यानंतर सेटिंग्स आणि प्रायव्हसीचा पर्याय मिळेल. 

- स्क्रोल करून लोकेशन सेटिंग्समध्ये जा. ऑटोमेटिकली डिलीट लोकेशन हिस्ट्रीचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा. 

- क्लिक केल्यानंतर तीन पर्याय दिसतील. मॅन्यूअली हिस्ट्री डिलीट करत नाही तोपर्यंत हिस्ट्री डिलीट होत नाही. त्यानंतर 18 महिने आणि 3 महिने हे पर्याय दिसतील. 

- देण्यात आलेला कोणताही एक पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर त्याबाबत माहिती मिळेल. त्याखाली कन्फर्म आणि कॅन्सलचा पर्याय मिळेल.  

प्रवास सुखकर होणार! 'पब्लिक टॉयलेट' कुठे आहे हे Google Maps सांगणार

गुगल मॅप्सवर लवकरच सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलने 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अ‍ॅड केली आहेत. भारतातील 1700 शहरांमधील सार्वजनिक शौचालये ही गुगल मॅप्सवर मार्क केली आहेत. 'पब्लिक टॉइलट्स नियर मी' या नावाने हे फीचर अ‍ॅपवर असणार आहे. गुगलने दररोज प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी आणखी एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरमध्ये युजर्सना बाईक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर हे फीचर उपलब्ध असणार आहे. 

प्रवासाचं नो टेन्शन! Google Maps देणार भारतीयांसाठी तीन खास फीचर्स भारतीय युजर्सचा विचार करून गुगल मॅप्सने खास तीन नवीन इंडिया सेंट्रिक फीचर्स आणले आहेत. या तीन नेव्हिगेशन फीचर्सच्या मदतीने युजर्स पब्लिक ट्रान्सपोर्ट नेविगेट करू शकता. Train, Bus आणि Metro मधून प्रवास करणाऱ्या युजर्ससाठी हे नवीन फीचर्स फायदेशीर असणार आहेत. गुगल मॅप्समधील पहिलं फीचर हे सार्वजनिक बसमधून प्रवास करणाऱ्या युजर्सना प्रवासासाठी किती वेळ लागेल याची माहिती देणार आहे. तसेत त्या मार्गावर असणाऱ्या ट्रॅफिकबाबत सांगणार आहे. तसेच प्रवासी हे दुसऱ्या मार्गाने प्रवास करण्याचा विचार करत असतील तर त्यांना त्याबाबत यामध्ये माहिती देण्यात येणार आहे. प्रवासाठी इतर पर्याय यामुळे शोधता येतात. लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनचं लाईव्ह रनिंग स्टेटस दिसण्याची सुविधा देण्यात आली आहे.

 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल