शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिओनी एम ७ : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: September 26, 2017 11:02 IST

जिओनी कंपनीने एम ७ हा फुल व्ह्यू डिस्प्लेसह विविध उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

जिओनी एम ७ या मॉडेलमधील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यातील फुल व्ह्यू डिस्प्ले होय. यात कडा जवळपास नाहीत. हा डिस्प्ले ६.०१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आणि १:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५ डी या प्रकारातील असेल. यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी ३० हा गतीमान प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

जिओनी एम ७ या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस एफ/१.८ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्सचा प्रमुख तर ८ मेगापिक्सल्सचा दुसरा कॅमेरा आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. या दोन्ही कॅमेर्‍यांनी काढलेली प्रतिमा ही अतिशय उच्च दर्जाची असेल असा दावा जिओनी कंपनीने केला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा अमिगो ५.० हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  

जिओनी एम ७ हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये १९९९ युऑन (सुमारे २० हजार रूपये) मूल्यात लाँच करण्यात आले आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह अन्य बाजारपेठांमध्ये उतारण्याची शक्यतादेखील आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल