शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: August 13, 2021 17:32 IST

Get Free JioPhone: तुम्हाला फक्त दोन रिचार्ज प्लॅनमधून एकाची निवड करायची आहे आणि त्यावर तुम्हाला Jio Phone मोफत मिळेल.  

ठळक मुद्देJio Phone 2021 ऑफरमध्ये कंपनीने हा फोन मोफत मिळवण्यासाठी दोन प्लॅन सादर केले आहेत.जियोच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 वर्षांची वैधता मिळते. जियो फोन हा एक 4G फीचर फोन आहे.

जूनच्या अखेरीस जियोने आपल्या आगामी 4G स्मार्टफोन JioPhone Next ची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते कि हा जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल आणि हा फोन 10 सप्टेंबर रोजी भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. परंतु या कंपनीचा अजून एक स्वस्त 4G फोन आधीच बाजारात उपलब्ध आहे, तो म्हणजे JioPhone. हा एक 4G फिचर फोन आहे, जो WhatsApp, Facebook आणि इतर काही अ‍ॅप्सना सपोर्ट करतो. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या अश्या ऑफर बद्दल सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही हा फोन मोफत मिळवू शकता. तुम्हाला फक्त दोन रिचार्ज प्लॅनमधून एकाची निवड करायची आहे आणि त्यावर तुम्हाला Jio Phone मोफत मिळेल.  

Jio Phone Offer 

Jio Phone 2021 ऑफरमध्ये कंपनीने हा फोन मोफत मिळवण्यासाठी दोन प्लॅन सादर केले आहेत. ही ऑफर खूप जुनी आहे परंतु अजूनही हीच फायदा घेता येईल. कंपनीचे दोन प्लॅन पुढील प्रमाणे आहेत:  

Jio चा 1999 रुपयांचा प्लॅन 

जियोने 1,999 रुपयांचा प्लॅन 2 वर्षांच्या वैधतेसह सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 48 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्लॅनमध्ये जियो अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळते. परंतु या प्लॅनचे मुख्य आकर्षण या प्लॅनसोबत मिळणार 4जी जियो फोन आहे.  

Jio चा 1499 रुपयांचा प्लॅन 

जियोच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 वर्षांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 24 जीबी डेटा मिळतो. सोबत जियो अ‍ॅप्स सब्सक्रिप्शन आणि जियो फोन मोफत मिळतो. 

Jio Phone चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

जियो फोन हा एक 4G फीचर फोन आहे. यात 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. तासेच यात 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 ड्युअल कोर प्रोसेसर, 512 एमबी रॅम आणि 4 जीबी स्टोरेज मिळते. या फिचर फोनमध्ये 2-MP रियर कॅमेरा आणि एक वीजीए फ्रंट कॅमेरा आहे. जियो फोनमध्ये 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 4जी वीओएलटीई सह हा फोन ब्लूटूथ, वाय-फाय, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 ला सपोर्ट करतो.

टॅग्स :JioजिओSmartphoneस्मार्टफोन