शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

108MP कॅमेरा, 50MP ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेल्या शानदार फोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट; जाणून घ्या Flipkart ची ऑफर 

By सिद्धेश जाधव | Updated: February 2, 2022 17:44 IST

Flipkart Discount On Vivo V23 Pro 5G: Vivo V23 Pro 5G स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 12GB RAM आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह लाँच झाला आहे.  

Vivo V23 Pro 5G भारतात लाँच होऊन फक्त काही दिवस झाले आहेत. आता या रंग बदलणाऱ्या स्मार्टफोनवर ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart डिस्काउंट देत आहे. त्यामुळे हा 108MP कॅमेरा, 12GB RAM आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेला स्मार्टफोन स्वस्तात विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनचे स्पेक्स, किंमत आणि ऑफर्स.  

Vivo V23 Pro चे स्पेसिफिकेशन्स   

विवो वी23 प्रो च्या फ्रंटला ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलची सुपर वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सोबत कंपनीनं फ्रंट फ्लॅश देखील दिला आहे. बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लियर प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे.    

Vivo V23 Pro मध्ये 6.56 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनला मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा डिवाइस अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो.    

यात 12GB पर्यंत RAM देण्यात आला आहे, सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम मिळतो त्यामुळे एकूण 16GB रॅम होतो. हा फोन 256GB स्टोरेजसह विकत घेता येईल. Vivo V23 Pro एक ड्युअल सिम फोन 5G Phone आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी 4,300एमएएचची बॅटरी 44वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.    

Vivo V23 Pro 5G Price and Offer 

विवो वी23 प्रो च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 43,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु आता हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेताना HDFC बँकेचा कार्डचा वापर केल्यास 3000 रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही फक्त 1,333 रुपयांचा हप्ता देखील हा फोन घरी आणू शकता.  

हे देखील वाचा:

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान