शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फिटबीट आयोनिक स्मार्टवॉचची घोषणा

By शेखर पाटील | Updated: August 30, 2017 07:00 IST

फिचर्सचा विचार केला असता, हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, जीपीएस ट्रॅकींग आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यात ‘रिलेटिव्ह एसपीओ२’ हे विशेष सेन्सर देण्यात आले आहे.

ठळक मुद्देयात हार्ट रेट मॉनिटर, जीपीएस ट्रॅकींग आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेतयात ‘रिलेटिव्ह एसपीओ२’ हे विशेष सेन्सर देण्यात आले आहे.याच्या मदतीने रक्तातील ऑक्सीजनच्या प्रमाणाची माहिती मिळते

वेअरेबल्समधील मातब्बर कंपनी म्हणून ख्यात असणार्‍या फिटबीटने फिटबीट आयोनिक या नावाने आपले पहिले स्मार्टवॉच लाँच केले असून यात आरोग्यविषयक बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे.

वेअरेबल्स अर्थात परिधान करण्याजोग्या उपकरणांच्या निर्मितीत फिटबीट कंपनी आघाडीवर असली तरी अलीकडच्या काळात त्यांच्या मिरासदारीला मोठे आव्हान मिळाले आहे. अ‍ॅपल व सॅमसंगसारख्या कंपन्यांनी आपल्या स्पार्टवॉचमध्ये उत्तमोत्तम फिचर्स दिले आहेत. तर दुसरीकडे शाओमीसारख्या कंपन्यांनी किफायतशीर दरात फिटनेस ट्रॅकर, स्मार्ट बँड आदी उपकरणे सादर केल्यामुळे फिटबीट कंपनीच्या या क्षेत्रातील मिरासदारीला आव्हान मिळाला आहे. यावर मात करण्यासाठी फिटबीट स्मार्टवॉच सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर आता फिटबीट आयोनिक या मॉडेलच्या लाँचिंगमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. फिटबीट आयोनिक हे स्मार्टवॉच २९९.९५ डॉलर्स इतक्या मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.

फिचर्सचा विचार केला असता, हे स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहे. यात हार्ट रेट मॉनिटर, जीपीएस ट्रॅकींग आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यात ‘रिलेटिव्ह एसपीओ२’ हे विशेष सेन्सर देण्यात आले आहे. याच्या मदतीने रक्तातील ऑक्सीजनच्या प्रमाणाची माहिती मिळते. याच्या मदतीने ‘स्लीप अ‍ॅप्नीया’सारख्या निद्राविषयक विकारांवर अचूक नजर ठेवणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष म्हणजे यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल चार दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात चौरसाकृती टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात एनएफसी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यात स्मार्टफोनवरील नोटिफिकेशन्स पाहता येतील. याशिवाय फिटबीट आयोनिक या मॉडेलमध्ये २.५ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले आहे. फिटबीट अ‍ॅपच्या सहाय्याने युजर आपला स्मार्टफोन याला अटॅच करू शकतो. यात थर्ड पार्टी स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन्स वापरण्याची सुविधादेखील आहे. फिटबीट आयोनिक या मॉडेलची कंपनीच्या वेबसाईटवरून नोंदणी सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे स्मार्टवॉच ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान