शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ECG आणि EDA सेन्सरसह Fitbit Charge 5 फिटनेस बॅंड लाँच; जाणून घ्या भारतीय किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: August 26, 2021 12:28 IST

Fitbit Charge 5 Price: वियरेबल्स ब्रँड Fitbit ने आपला लेटेस्ट फिटनेस ट्रॅकर Fitbit Charge 5 भारतात सादर केला आहे. यात स्ट्रेस, हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटर देण्यात आला आहे.  

वियरेबल्स ब्रँड Fitbit ने आपला लेटेस्ट फिटनेस ट्रॅकर Fitbit Charge 5 भारतात लाँच केला आहे. या नव्या फिटनेस ट्रॅकरमध्ये कंपनीने अनेक महत्वाचे आणि उपयुक्त सेन्सर्स दिले आहेत. यात ECG आणि EDA सेन्सरचा समावेश आहे. यात सात दिवसांच्या बॅटरी लाईफसह AMOLED कलर टचस्क्रीन देण्यात आली आहे.  

Fitbit Charge 5 चे स्पेसिफिकेशन्स  

Fitbit Charge 5 मध्ये 1.04-इंचाचा कलर अ‍ॅमोलेड टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अल्वेज ऑन डिस्प्ले आहे. पर्सनलायजेशनसाठी यात 20 कलरफुल वॉच फेस देण्यात आले आहेत. शरीरातील ऑक्सिजनचा स्थर मोजण्यासाठी यात SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात स्किन टेम्परेचर सेन्सर आणि हार्ट रेट मॉनिटर देखील देण्यात आला आहे. शरीरातील स्ट्रेस लेव्हल मोजण्यासाठी यात EDA सेन्सर मिळतो. यातील ECG फिचर लाँच नंतर काही दिवसांनी अ‍ॅक्टिव्हेट करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.  

Fitbit Charge 5 मध्ये बिल्ट-इन GPS + GLONASS आणि NFC देखील आहे. हा ट्रॅकर 50 मीटर पर्यंत वॉटर-रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. दोन तासांत फुलचार्ज होणारा हा बँड 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. ब्लूटूथ द्वारे हा डिवाइस iOS 12.2 आणि अँड्रॉइड 8.0 आणि त्यावरील Apple आणि Android डिवाइससह कनेक्ट करता येईल. तुम्ही तुमची आरोग्यविषयक माहिती फिटबीटच्या अ‍ॅपमधून मिळवू शकता.   

Fitbit Charge 5 ची किंमत  

Fitbit Charge 5 ची भारतातील 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फिटनेस ट्रॅकर तीन कलर ऑप्शन्ससह उपलब्ध होईल. भारतासह जगभरात सादर झालेल्या या फिटनेस बँडची प्री बुकिंग अनेक ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. Fitbit Charge 5 सोबत तुम्हाला सहा महिन्यांचे फिटबिट प्रीमियम सब्स्क्रिप्शन मोफत मिळेल. 

टॅग्स :Androidअँड्रॉईड