शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर

By शेखर पाटील | Updated: January 15, 2018 14:14 IST

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारा ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन विवो या कंपनीने प्रदर्शित केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारा ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन विवो या कंपनीने प्रदर्शित केला आहे. लास व्हेगास शहरातील सीईएस-२०१८ या प्रदर्शनीत काही दिवसांपूर्वीच डोगी कंपनीने डिस्प्लेवरच फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन प्रदर्शित करून टेकविश्‍वाचे लक्ष वेधून घेतले होते.

अर्थात हे मॉडेल बाजारपेठेत येण्यासाठी अद्याप अवकाश आहे. या पार्श्‍वभूमीवर, विवो कंपनीनेही याच प्रकारातील मॉडेलचे अनावरण केले असून ते लवकरच बाजारपेठेत दाखल होणार असल्याचेही घोषित केले आहे. अर्थात ग्राहकांना डोगी कंपनीआधी विवोचा हा स्मार्टफोन वापरण्यासाठी मिळणार आहे. आजवर सर्व स्मार्टफोनमधील फिंगरप्रिंट स्कॅनर हे एक तर डिस्प्लेवर असणार्‍या होम बटणच्या खाली अथवा मागील बाजूस असतात. अर्थात याचा डिस्प्लेशी काहीही संबंध नसतो. मात्र विवो कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये होम बटणाच्या ठिकाणीच फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. म्हणजे कुणीही तेथेच आपले बोट टेकवून हा स्मार्टफोन अनलॉक करू शकतो.विवो कंपनीच्या या स्मार्टफोनमधील ऑन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरचे तंत्रज्ञान सायनॅप्टीक्स या कंपनीने विकसित केले आहे. याच्या अंतर्गत ओएलईडी डिस्प्लेखालीच स्कॅनर दिलेले आहे. होम बटनाच्या ठिकाणी डिस्प्लेवर बोट ठेवल्यानंतर याचे तातडीने ऑथेंटीकेशन करून लाईट लागतो. यानंतर स्मार्टफोनचा डिस्प्ले अनलॉक होतो. विवो कंपनीने हा स्मार्टफोन आणि यातील ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर या फिचरचीच माहिती सध्या जाहीर केली आहे. याचे नाव, अन्य फिचर्स आणि मूल्य आदींची माहिती येत्या काही दिवसांमध्ये याला लाँच करतांना घोषीत करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल