शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

फिफा १८ गेमची एंट्री: जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: October 2, 2017 11:48 IST

इए स्पोर्टस् या कंपनीने आधी जाहीर केलेला फिफा १८ हा गेम ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असून भारतात तो ३ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजेच इए स्पोर्टस या कंपनीच्या फिफा या मालिकेतील सर्व गेम्सला जगभरातील युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे

ठळक मुद्देफिफा-१८ हा गेम फिफा अल्टीमेट टिम, करियर मोड, किक ऑफ आणि लोकल सीझन या चार मोडमध्ये गेमर्सला खेळणे शक्य आहेयातील पहिल्या प्रकारात गेमरला उत्तम दर्जाचा संघ बांधणीची संधी मिळेलऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धांसह चालू फुटबॉल सीझनमध्ये भागही घेता येणार आहे

इए स्पोर्टस् या कंपनीने आधी जाहीर केलेला फिफा १८ हा गेम ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असून भारतात तो ३ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजेच इए स्पोर्टस या कंपनीच्या फिफा या मालिकेतील सर्व गेम्सला जगभरातील युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. याची अद्ययावत अर्थात १८ वी आवृत्ती अलीकडेच सादर करण्यात आली होती. या वर्षी जून महिन्यात लॉस एंजल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक एंटरटेनमेंट एक्सपो म्हणजेच ई ३-२०१७ या प्रदर्शनीत फिफा १८ या गेमची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. जगभरातील गेमर्सला २९ सप्टेंबरपासून याला उपलब्ध करण्यात आले असून भारतीय गेमर्सला मात्र ३ ऑक्टोबरपासून याला खरेदी करता येणार आहे. हा आजवरचा सर्वात उत्तम दर्जाचा फुटबॉल गेम असल्याचे मानले जात आहे.

फिफा-१८ हा गेम फिफा अल्टीमेट टिम, करियर मोड, किक ऑफ आणि लोकल सीझन या चार मोडमध्ये गेमर्सला खेळणे शक्य आहे. यातील पहिल्या प्रकारात गेमरला उत्तम दर्जाचा संघ बांधणीची संधी मिळेल. यात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धांसह चालू फुटबॉल सीझनमध्ये भागही घेता येणार आहे. यात मल्टीपल कंट्रोल प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यामुळे याला हातात धरून अथवा जॉय कॉन्स वा मल्टीपल कंट्रोलरच्या मदतीने खेळता येणार आहे. गेमिंग कन्सोलवर खेळतांना यात ७२० पिक्सल्स (एचडी) क्षमतेची प्रतिमा दिसेल तर हे मॉडेल अन्य डिस्प्लेला जोडल्यास १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण दिसू शकणार आहे.

फिफा १८ हा गेम प्लेस्टेशन ३ व प्लेस्टेशन ४, एक्सबॉक्स ३६० व एक्सबॉक्स १ तसेच निंतेंदो स्वीच या गेमिंग कन्सोलसह विंडोज प्रणालीसाठी सादर करण्यात आला आहे. याचे मूल्य ५५ ते ६० युरोच्या दरम्यान आहे. भारतात हा गेम अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ३,६९९ रूपयांपासून सुरू होणारे आहे. तर अन्य शॉपींग पोर्टल्सवर मात्र हा गेम मूळ किंमतीपेक्षा अधिक मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.

फिफा १८ हा गेम फुटबॉलच्या चाहत्यांसाठी एका पर्वणीसमान आहे. यात अगदी खर्‍याखुर्‍या फिफा संघटनेशी संलग्न असणार्‍या सर्व स्पर्धा, विविध देशांचे खेळाडू आदींचा समावेश करण्यात आला आहे. यात  खर्‍या खेळाडूंच्या शैलीची हुबेहूब कॉपी करण्यात आली आहे. १२ देशांमधील ५२ विख्यात स्टेडियम्स आणि अन्य ३० मैदानांसह एकूण ८२ मैदाने उपलब्ध असतील. यामध्ये जगभरातील फुटबॉलच्या सर्व प्रिमीयर लीग आणि त्यातील खेळाडूंचा समावेश असेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे फिफा १८ या गेममध्ये अल्टीमेट टिम हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत विद्यमान खेळाडूंसह पेले, मॅराडोना, रोनाल्डो, लेव्ह येशीन, थिएरी ऑन्री आदींसारख्या माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश असणार्‍या संघाची निर्मिती करून त्यांच्या माध्यमातून खेळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक गेमसाठी अगदी खर्‍याखुर्‍या फुटबॉल सामन्याप्रमाणे बहारदार समालोचनाची व्यवस्थादेखील यात असेल.

पहा: फिफा १८ गेमची झलक दर्शविणारा ट्रेलर.

टॅग्स :Sportsक्रीडा