शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टेलिग्रामवर मल्टीपल अकाऊंट वापरण्याची सुविधा

By शेखर पाटील | Updated: January 1, 2018 09:37 IST

टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे.

टेलिग्राम मॅसेंजरवर आता कुणीही युजर तीन विविध मोबाईल क्रमांकांचे तीन स्वतंत्र अकाऊंट वापरू शकणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. टेलिग्राम मॅसेंजरची ४.७ ही नवीन आवृत्ती अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. एका महिन्यातच या मॅसेंजरने दोन अपडेट सादर केल्याची बाब लक्षणीय आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे मल्टीपल अकाऊंट होय. सध्या पॅरलल स्पेससारख्या अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या मदतीने एका स्मार्टफोनवर टेलिग्रामचे दोन अकाऊंट वापरणे शक्य आहे. आता मात्र कोणत्याही बाह्य अ‍ॅपच्या मदतीविना ही सुविधा मिळणार आहे. ताज्या अपडेटमध्ये मल्टीपल अकाऊंटची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने एकाच स्मार्टफोनवर तीन विविध मोबाईल क्रमांकाने टेलिग्राम अकाऊंट वापरता येतील. या तिन्ही खात्यांचे नोटिफिकेशन्स त्या युजरला मिळतील. या नोटिफिकेशन्सला कस्टमाईज करण्याची सुविधाही असेल. तर साईडबारवर स्वाईप करून कुणीही आपल्याला हव्या त्या अकाऊंटचा वापर करू शकेल. टेलिग्रामच्या ताज्या आवृत्तीत नवीन अ‍ॅपीअरन्स सेटींग देण्यात आली आहे. याचा वापर करून कुणीही चार थीम्सपैकी हव्या त्या थीमचा वापर करू शकतो. सध्या युजर्ससाठी चार थीम देण्यात आल्या आहेत. यात हव्या त्या थीमला कस्टमाईज करण्याची सुविधाही दिलेली आहे. तर ताज्या आवृत्तीत व्हाटसअ‍ॅपप्रमाणे क्विक रिप्लायची सुविधादेखील देण्यात आली आहे. कुणीही चॅटबॉक्समधील मॅसेजला डाव्या बाजूने स्वाईप करून यावर तात्काळ प्रतिक्रिया देऊ शकतो. पहिल्यांदा हे अपडेट आयओएस प्रणालीसाठी देण्यात आली आहे. अर्थात अँड्रॉइडचे अपडेटही लवकरच देण्यात येणार आहे.

(छायाचित्र सौजन्य :- टेलिग्राम ब्लॉग)

टॅग्स :technologyतंत्रज्ञान