शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

स्काइप लाइट अ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा

By शेखर पाटील | Updated: October 20, 2017 23:59 IST

मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप या सेवेच्या लाईट आवृत्तीवर ग्रुप व्हिडीओ कॉलींगसह अन्य फिचर्स देण्याची घोषणा केली आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या स्काईप या सेवेच्या लाईट आवृत्तीवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसह अन्य फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी खास भारतीयांसाठी स्काईप या अ‍ॅपची लाईट आवृत्ती लाँच करण्यात आली होती. हे अ‍ॅप आकारमानाने आटोपशीर असून ते इंटरनेटची गती संथ असतांनाही व्यवस्थित कार्यरत राहू शकते. आता याच लाईट आवृत्तीसाठी ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे स्काईपच्या मूळ आवृत्तीत ही सुविधा आधीपासूनच आहे. याशिवाय गुगल हँगआऊट, व्हायबर, लाईन, फेसबुक मॅसेंजर आदींमध्येही हे फिचर देण्यात आलेले आहे. आता हीच सुविधा स्काईप लाईटच्या अ‍ॅपमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्यांनी स्काईप लाईट हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेले नाही, अशा युजर्सलाही व्हिडीओ चॅटमध्ये सहभागी करण्याची सुविधा यात प्रदान करण्यात आली आहे. यासाठी संबंधित युजरला व्हॉटसअ‍ॅप मॅसेज अथवा ई-मेलद्वारे २४ तासांसाठी व्हॅलिड असणारी इनव्हिटेशन लिंक पाठवता येणार आहे. यातून समोरच्या युजरला स्काईप लाईट अ‍ॅप अथवा वेबवरील याचे एक्सटेन्शन डाऊनलोड करण्याचे सूचित केले जाणार आहे. अर्थात यानंतर संबंधित युजरला ग्रुप व्हिडीओ चॅटमध्ये समाविष्ट करता येईल.मायक्रोसॉफ्टने भारतात स्काईपचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच स्काईपला केंद्र सरकारच्या आधारशी संलग्न करण्यात आले आहे. यामुळे कुणाचेही ऑनलाइन ऑथेंटिकेशन सोपे झाले आहे. यानंतर मशिन लर्निंग तंत्रज्ञानाने युक्त असणारे एसएमएस इनसाईट हे विशेष फिचर देत स्पॅमर्सपासून मुक्तीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या स्काईप लाईटचे ५० लाखांच्या आता डाऊनलोड असल्याने भारतात स्थान निर्माण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टला खूप प्रयत्न करावे लागतील हे उघड आहे. या अनुषंगाने ग्रुप व्हिडीओ कॉलींगचे फिचर महत्वाचे ठरू शकते.

टॅग्स :Mobileमोबाइल