शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी

By शेखर पाटील | Updated: December 15, 2017 12:46 IST

फेसबुक मॅसेंजरच्या युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याचे आता तब्बल १७० कोटी युजर्स असल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफेसबुक मॅसेंजर अ‍ॅपचे एकूण १३० कोटी डाऊनलोड झाले असून उर्वरित युजर्स संगणकावरून याचा वापर करत असल्याचं कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. २००८ साली याला फेसबुक चॅट नावाने लाँच करण्यात आलं होतं.

फेसबुक मॅसेंजर अ‍ॅपचे एकूण १३० कोटी डाऊनलोड झाले असून उर्वरित युजर्स संगणकावरून याचा वापर करत असल्याचं कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. फेसबुक मॅसेंजरला आधी स्वतंत्र अस्तित्व नव्हते. २००८ साली याला फेसबुक चॅट नावाने लाँच करण्यात आलं होतं. प्रारंभी याला फक्त वेबवर वापरता येत होतं. यानंतर अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात आले. तर गेल्या तीन वर्षांपासून याला स्वतंत्र ओळख देण्यात आली. पहिल्या टप्प्यात फेसबुकच्या अ‍ॅपसोबत याला डाऊनलोड करणेदेखील अनिवार्य करण्यात आलं. यामुळे साहजीकच याचे डाऊनलोड वाढले. लवकरच या अ‍ॅपने एक अब्ज डाऊनलोडचा टप्पा पार पाडला. अर्थात डाऊनलोड वाढत असतांना याच्या प्रत्यक्ष वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यासाठी फेसबुकने युजर्सला मॅसेंजरवरून विविध सुविधा प्रदान केल्या. यात पैशांची आदान-प्रदान करण्याची सुविधेसह विविध गेम्स, इमोजी, व्हिडीओ व व्हाईस कॉलींग, आकर्षक फिल्टर्स आदी देण्यात आल्यामुळे युजर्स मोठ्या संख्येने फेसबुक मॅसेंजरचा उपयोग करत आहेत. अलीकडेच फेसबुकने खास मुलांसाठी स्वतंत्र मॅसेंजर लाँच केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता हा मॅसेंजर तब्बल १.७ अब्ज म्हणजेच १७० कोटी युजर्स वापरत असल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. 

वैयक्तिक आणि सामूहिक या दोन्ही प्रकारातील चॅटिंगसाठी फेसबुक मॅसेंजरचा वापर वाढत आहे. तर अलीकडच्या काळात यावर कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्सने युक्त असणारे चॅटबॉक्सदेखील मोठ्या प्रमाणात अवतरले आहेत. याच्या मदतीने अगदी भन्नाट पध्दतीच्या मनोरंजनासह विविध कंपन्यांना आपल्या ग्राहकांशी थेट संपर्काची स्वयंचलीत यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. अलीकडेच मॅसेंजरवर विविध चॅटबॉट सर्च करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. फेसबुक मॅसेंजरवरील चॅटबॉट ही बाब अतिशय उत्कंठावर्धक असून यात प्रत्येक क्षणाला नवनवीन बाबींची भर पडत आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानFacebookफेसबुकMessengerमेसेंजर