शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल विक्रीवर नियामक मंडळ स्थापन करा मोबाईल रिटेलर्सची मागणी राष्ट्रीय स्तरावर रिटेलर्सला एकत्र आणण्यासाठी ॲपची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:32 IST

मोबाईल विक्रीवर नियामक मंडळ स्थापन करा

मोबाईल विक्रीवर नियामक मंडळ स्थापन करा
मोबाईल रिटेलर्सची मागणी
राष्ट्रीय स्तरावर रिटेलर्सला एकत्र आणण्यासाठी ॲपची निर्मिती
मुंबई : मोबाईल विक्रीवर शासनाचे नियंत्रण राहावे म्हणून नियामक मंडळ स्थापन करण्याची मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रीय स्तरावर मोबाईल रिटेलर्सला एकत्र आणण्यासाठी असोसिएशनने मोबाईल ॲप तयार केल्याची घोषणाही यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष शांतीलाल गाला यांनी केली.
गाला म्हणाले, ऑनलाईन पद्धतीने मोबाईल खरेदीचे प्रमाण दिवसांगणिक वाढत आहे. मात्र त्यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण दिसत नाही. ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतरही मदतीसाठी कुठे धाव घ्यायची, याबाबत ऑनलाईन खरेदीमध्ये स्पष्टता नाही. शिवाय अधिक व्हॅट असलेल्या राज्यातून मोबाईल खरेदी करून ऑनलाईन पद्धतीने कमी व्हॅट असलेल्या राज्यात विक्री करण्याचे प्रकारही सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जीएसटी कर प्रणालीनंतर या प्रकार बंद होणार असला, तरी मोबाईल कॉलच्या दरांवर नियंत्रण ठेवणार्‍या शासनाने मोबाईल दरांवरही नियंत्रण ठेवण्याची मागणी गाला यांनी केली.
मोबाईलच्या किंमतीत होणारे चढ-उतार आणि मोबाईल संदर्भातील विविध माहिती देशातील २ लाख मोबाईल रिटेलर्स आणि कोट्यवधी ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी संघटनेने एका ॲपची निर्मिती केली आहे. गुरूवारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश लाखयानी या ॲपचे लोकार्पण करतील. केवळ अधिकृत रिटेलर्सला हे ॲप मोफत स्वरूपात डाऊनलोड करता येणार आहे. कारण ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करताना जी माहिती भरावी लागेल, त्यात व्हॅट टीआयएन क्रमांक भरावा लागणार आहे.
..................
ग्राहकांना होणार फायदा!
मोबाईलच्या किंमतीत वेळोवेळी कपात होत असते. मात्र रिटेलर्सपर्यंत ती माहिती पोहचली नाही की ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागतो. दुकानदारांना मात्र मुळ किंमतीत झालेली कपात कंपनी देते. परिणामी या ॲपच्या माध्यमातून कमी होणार्‍या किंमतीची माहिती रोजच्या रोज रिटेलर्सला मिळणार आहे. शिवाय एखाद्या ग्राहकाने केलेल्या तक्रारीचा क्रमांक ॲपवर दिल्यास त्याचे तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्नही संघटना करणार आहे.
......................................