शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

इलॉन मस्क यांची मोठी घोषणा! ट्विटरवरील पोस्ट वाचण्यावर मर्यादा; जाणून घ्या नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 13:01 IST

twitter new rules 2023 : इलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली असून ट्विटर युजर्ससाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.  

Twitter New Rules : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मस्क यांनी अनेकदा वेगवेगळे नियम लागू करून ट्विटरला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले. अशातच शनिवारी त्यांनी एक मोठी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता ट्विटरवर एका दिवसात वाचल्या जाणाऱ्या पोस्टवर तात्पुरत्या (Twitter Temporary Limit) मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनचा सामना करण्यासाठी आम्ही या तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. सत्यापित खाती असलेले युजर्स (Verified accounts) एका दिवसात ६ हजार पोस्ट वाचू शकतात. तसेच असत्यापित खाती (Unverified accounts) असलेल्या युजर्संना दररोज ६०० पोस्ट वाचता येणार आहेत. याशिवाय नवीन असत्यापित खाती असलेल्या युजर्संना दिवसाला ३०० पोस्ट वाचता येणार आहेत. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितले आहे. लक्षणीय बाब म्हणजे लवकरच या मर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याचेही मस्क यांनी स्पष्ट केले. 

दुसर्‍या ट्विटमध्ये मस्क म्हणाले की, सत्यापित खात्यांची मर्यादा लवकरच ८००० एवढी वाढवणार आहोत. तर असत्यापित खात्यांना दिवसाला ८०० आणि नवीन असत्यापित खात्यांना दिवसाला ४०० पोस्ट वाचता येणार आहेत.

 दरम्यान, डेटा स्क्रॅपिंगमुळे ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी हा दुसरा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ट्विटरवरील पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणे बंधनकारक आहे. ट्विटर अकाउंट नसेल तर तुम्हाला ट्विटरवरील पोस्ट अथवा मजकूर वाचता येणार नाही.

 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञानTwitterट्विटरbusinessव्यवसाय