मुंबई, दि. 18 - गेल्या अनेक महिन्यांपासून रिलायन्स जिओच्या वाढत्या ग्राहकांचा धसका घेत इतर प्रतिस्पर्धी कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात नव-नव्या ऑफर आणत आहेत. भारती एअरटेलनं पोस्टपेड ग्राहकांसाठी आधीच्या सरप्राइज ऑफरप्रमाणे एक नवी ऑफर आणली आहे. यामध्ये 6 महिन्यांसाठी तब्बल 60 जीबी 4 जी डेटा मोफत मिळणार आहे.
ग्राहकाला दर महिन्याला 10 जीबी याप्रमाणे 6 महिन्याला 60 जीबी डेटा मिळणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ‘My Airtel App’ डाऊनलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर केवळ तीन सोपे टप्पे पार करून ही ऑफर तात्काळ मिळवता येणार आहे.
यापूर्वीही भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी 'एअरटेल सरप्राइज' ऑफर आणली होती. या ऑफरमध्ये 13 मार्चपासून कंपनी पोस्टपेड ग्राहकांना 30 जीबी डेटा देत होती. ग्राहकांना तीन महिन्यासाठी 30 जीबी डेटा फ्री देण्यात आला होता. मात्र, आता तब्बल 60 जीबी डेटा कंपनी देत आहे.