शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

शरीरातील ऑक्सिजनचा स्तर सांगणाऱ्या सेन्सरसह DIZO Watch 2 आणि Watch Pro लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: September 15, 2021 16:50 IST

Budget Smart watch Dizo Watch 2: हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 मॉनिटरसह DIZO Watch 2 आणि Watch Pro भारतात लाँच झाले आहेत.  

Realme TechLife ब्रँड Dizo ने आपले नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. ब्रँडने DIZO Watch 2 आणि DIZO Watch Pro असे दोन स्मार्ट वॉच कमी किंमतीत भारतात सादर केले आहेत. हे दोन्ही वॉच ईकॉमर्स साईट Flipkart च्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होतील. हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 मॉनिटर असे महत्वपूर्ण स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

DIZO Watch 2 आणि DIZO Watch Pro चे स्पेसिफिकेशन्स 

DIZO Watch 2 मध्ये 1.69-इंचाचा आणि DIZO Watch Pro मध्ये 1.75-इंचाचा चौरसाकृती डिस्प्ले देण्यात आला आहे. या सेगमेंटमध्ये हा डिस्प्ले सर्वात मोठा आहे. दोन्ही स्मार्ट वॉच 100 पेक्षा जास्त वॉच फेससह सादर करण्यात आले आहेत. स्मरतवच कंट्रोल करण्यासाठी टचसह एका फिजिकल बटणाचा वापर करता येतो. हे वॉच 5 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टन्स आणि IP68 सर्टिफिकेशनसह बाजारात येतात.  

यात हार्ट रेट मॉनिटर देण्यात आला आहे जो हृदयाचे ठोके मॉनिटर करतो. तर SpO2 मॉनिटर शरीरातील प्राणवायूचे प्रमाण सांगतो. त्याचबरोबर यात स्लीप ट्रॅकर, सिडेन्ट्री आणि हायड्रेशन रिमांडरची सुविधा देखील देण्यात आली आहे. DIZO Watch 2 स्मार्टवॉच 15 स्पोर्ट्स मोड्स ओळखू शकतो, तर प्रो व्हेरिएंटमध्ये 90 पेक्षा जास्त मोड्स उपलब्ध आहेत. प्रो व्हेरिएंटमधील बिल्ट-इन ड्युअल सॅटेलाईट GPS तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीविना तुमची आउटडोर अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकते. 

दोन्ही स्मार्टवॉचद्वारे म्युजिक कंट्रोल, हवामानाची माहिती, नोटिफिकेशन, रिमोट कंट्रोल कॅमेरा असे अनेक फीचर्स मिळतात. DIZO Watch 2 मध्ये 260mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, तर प्रो व्हेरिएंट 390mAh च्या बॅटरीसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही वॉच ब्लूटूथ 5.0 चा वापर करतात.  

DIZO Watch 2 सीरीजची किंमत 

रियलमी DIZO Watch 2 ची किंमत 2,999 रुपये आहे, इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हा स्मार्टवॉच 1999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. DIZO Watch 2 Pro ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि हा तुम्ही मर्यादित कालावधीत 4,499 रुपयांच्या खास किंमतीत विकत घेऊ शकता. या स्मार्टवॉचची विक्री 22 सप्टेंबरपासून फ्लिकार्टवर सुरु होईल.  

टॅग्स :realmeरियलमी