शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिओ पेमेंट्स बँक महिनाअखेर होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:43 IST

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूह व स्टेट बँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेली जियो पेमेंट्स बँक या डिसेबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स समूह व स्टेट बँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेली जियो पेमेंट्स बँक या डिसेबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. जियो पेमेंट्स बँकेत रिलायन्स समूहाचे ७० टक्के तर स्टेट बँक आॅफ इंडियाचे ३० टक्के भांडवल आहे. स्टेट बँकेजवळ ग्राहकांची ४२ कोटी खाती आहेत तर रिलायन्सच्या ‘जियो फोर-जी’ फोनचे १३ कोटी ग्राहक आहेत व त्यात झपाट्याने वाढ होत आहे. जियोच्या या ‘फोर-जी’ नेटवर्कचा उपयोग ज्या ठिकाणी बँका नाहीत अशा दुर्गम खेड्यात बँकिंग सेवा पुरविण्यासाठी होऊ शकतो. म्हणून स्टेट बँकेने जियोशी हातमिळवणी केल्याचे सूत्रांना वाटते.रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने २०१६ साली पेमेंट्स बँकेसाठी एकूण ११ बड्या कंपन्यांना परवाने दिले होते. त्यात रिलायन्स समूह, आदित्य बिर्ला समूह, एअरटेल, चोलामंडलम समूह, टेक-महिन्द्र, सन फार्मा, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी आजवर चार पेमेंट्स बँका सुरू झाल्या आहेत. त्यात पेटेम इंडिया पोस्ट, फिनो पेटेक व एअरटेलचा समावेश आहे. जियो पेमेंट्स बँक व्यवसाय सुरू करणारी पाचवी पेमेंट्स बँक असेल.पेमेंट्स बँकांची संकल्पना नवी आहे व ती सतत वाढत असलेल्या डिजिटल (आॅनलाईन) पेमेंटससाठी सुरू केली आहे. इतर व्यावसायिक बँकांप्रमाणे पेमेंट्स बँका ग्राहकांना कर्ज मंजूर करत नाहीत व एका ग्राहकाकडून फक्त एक लाख रुपये एवढीच ठेव स्वीकारू शकतात. पेमेंट्स बँका ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. पण एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, ई-वॉलेट, मोबाईल वॉलेट यासोबतच पैसे एका खात्यातून दुसºया खात्यात पाठवणे या सेवा पुरवितात व यावर जे कमिशन मिळते ते या बँकांचे उत्पन्नाचे साधन असते.