शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

आयफोन X vs. गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३०: तुलना

By शेखर पाटील | Updated: September 13, 2017 15:19 IST

अ‍ॅपलने आयफोन-X लाँच केला असला मात्र  याआधी बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० आदींसारखे फ्लॅगशीप मॉडेल्स उपलब्ध आहेत. या तिन्ही मॉडेल्सचे हे तुलनात्मक अध्ययन.

ठळक मुद्देआयफोन-X चे मूल्य ९९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहेसॅमसंग गॅलेक्सी नोट ८ चे मूल्य ९५० डॉलर्सपासून सुरू होईलएलजी व्ही ३० मॉडेलचे मूल्य ८५० डॉलर्सच्या आसपास ठेवणार असल्याचे समजते.

अ‍ॅपलने आयफोन-X लाँच केला असला मात्र  याआधी बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० आदींसारखे फ्लॅगशीप मॉडेल्स उपलब्ध आहेत. या तिन्ही मॉडेल्सचे हे तुलनात्मक अध्ययन.

आयफोन-X हा आजवरचा सर्वात शक्तीशाली आणि अनेकविध फिचर्सनी सज्ज असणारा स्मार्टफोन मानला जात आहे. मात्र सध्या बाजारपेठेत काही मॉडेल्स याच तोलामोलाचे आहेत. यात सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० यांची नावे कुणी टाळू शकणार नाहीत. या तिन्ही फ्लॅगशीप मॉडेल्सची विविध फिचर्सबाबत तुलना केल्यानंतर आपल्याला खालील चित्र दिसून येते.

१) डिस्प्ले: आयफोन-X मॉडेलमध्ये ५.५ इंची आणि २४३६ बाय १४४० पिक्सल्सचा डिस्प्ले आहे. तर दोन्ही मॉडेलमधील डिस्प्ले तुलनेत मोठे आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि २९६० बाय १४४० पिक्सल्सचा डिस्प्ले असून हे मॉडेल फॅब्लेट प्रकारातील आहे. तर एलजी व्ही ३० मध्ये ६ इंची आणि २८८० बाय १४४० पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. अर्थात दोन्ही मॉडेल्सचे स्क्रीन मोठे असले तरी आयफोन- मध्ये फेस आयडी हे अभिनव फिचर असल्याचे विसरून चालणार नाही.

२) प्रोसेसर: आयफोन-X मध्ये बायोनिक ए ११ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ तसेच ऑक्टो-कोअर सॅमसंग एक्झीनॉस ८८९५ हे दोन पर्याय असतील. तर एलजी व्ही ३० मध्येही ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर असेल.

३) रॅम/स्टोअरेज: आयफोन-X च्या रॅमबाबत अ‍ॅपलने लॉचींग कार्यक्रमात माहिती दिलेली नाही. तथापि, विश्‍वासू सूत्रांच्या माहितीनुसार या मॉडेलचे रॅम ३ जीबी असू शकते. दुसरीकडे सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ ची रॅम ६ जीबी तर एलजी व्ही३० ची रॅम ४ जीबी असेल. आयफोन-X मध्ये ६४ आणि २५६ जीबी स्टोअरेजचा पर्याय असून ती वाढविण्याची सुविधा नाही. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये ६४ जीबी स्टोअरेज हे दोन टेराबाईपर्यंत वाढविता येणार आहे. तसेच एलजी व्ही ३० मॉडेलमध्ये ६४ व १२८ जीबी स्टोअरेजचे पर्याय असून यातही दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.

४) कॅमेरा:- आयफोन-X मधील मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांच्या स्वरूपात असेल. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्येही याच पध्दतीचा १२ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा आहे. तर एलजी व्ही ३० मॉडेलमध्ये मात्र १६ व १३ मेगापिक्सल्सचे ड्युअल कॅमेरे आहेत. तिन्ही मॉडेलमध्ये फोर-के चित्रिकरणाची सुविधा असेल. तर तिघांचे फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ७, ८ व ५ मेगापिक्सल्सचे असतील.

५) बॅटरी: आयफोन-X मधील बॅटरीची क्षमता नमूद करण्यात आली नाही. तथापि, आयफोन-७ प्लस मॉडेलपेक्षा ती दोन तास जास्त चालणार असल्याचे सांगण्यात आले. या बॅटरीत २१ तासांना टॉकटाईम, तर १३ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक शक्य असल्याचेही नमूद करण्यात आले. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० या दोन्ही मॉडेल्समध्ये प्रत्येकी ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर तिन्ही मॉडेल्स अनुक्रमे आयओएस ११, अँड्रॉइड नोगट ७.१ आणि नोगट ७.२ या प्रणालीवर चालणारे आहेत.

६) विशेष फिचर्स- आयफोन-X मध्ये वायरलेस चार्जींग, फेस आयडी, अ‍ॅनिमोजी, वॉटरप्रूफ व डस्ट रेझिस्टंट हे विशेष फिचर्स आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्येही वायरलेस चार्जींग, वॉटरप्रूफ व डस्ट रेझिस्टंट फिचर्स असतील. तर एलजी व्ही ३० मध्ये वायरलेस चार्जींग, वॉटरप्रूफ व डस्ट रेझिस्टंट सोबत वाईड अँगल कॅमेरा फ्लोटींग बार दिलेला आहे. 

७) मूल्य: आयफोन-X चे मूल्य ९९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ चे मूल्य ९५० डॉलर्सपासून सुरू होईल. तर एलजी व्ही ३० मॉडेलचे मूल्य अद्याप घोषीत करण्यात आलेले नाही. मात्र ताज्या माहितीनुसार एलजी कंपनी आपल्या या मॉडेलचे मूल्य स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ८५० डॉलर्सच्या आसपास ठेवणार असल्याचे समजते.

टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान