शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

आधार नंबर माहीत झाल्यास बँक अकाउंट हॅक होऊ शकतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:45 IST

Aadhaar card bank account hack: एखाद्याच्या हाती आधारचा नंबर लागला तर बँक अकाउंट हॅक होईल का, अशी अनेकांना आजही भीती असते.

आधार कार्डचा डेटा लीक होण्याच्या अनेक बातम्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना धडकी भरली होती. एखाद्याच्या हाती आधारचा नंबर लागला तर बँक अकाउंट हॅक होईल का, अशी अनेकांना आजही भीती असते. पण यावर आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.आधार नंबर इतरांना माहीत झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते का?नाही, असे होत नाही. जसे केवळ तुमच्या एटीएम कार्डचा नंबर माहीत असेल तर कोणालाही एटीएममधून पैसे काढता येत नाहीत, तसेच केवळ आधार नंबर माहीत असल्यानंतर कोणालाही तुमचे बँक अकाउंट हॅक करता येत नाही. जोवर तुम्ही पीन/ओटीपी एखाद्या व्यक्तीला/हॅकरला शेअर करत नाहीत, तोवर तुमचे बँक अकाउंट हॅक होऊ शकत नाही.इतर व्यवहारांनाही आधार लिंक असेल तर?इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी, जसे की म्युच्युअल फंड, शेअरसाठीचे डिमॅट अकाउंट किंवा मोबाइल कनेक्शनसाठी आधारचा नंबर दिलेला असतो. पण, त्यामुळे त्याचा कोणत्याही बँक अकाउंटवर परिणाम होत नाही.तुमच्या आधार कार्डचा नंबर जर एखाद्या व्यक्तीला माहीत झाला किंवा आधीच माहीत असेल तर तुमच्या बँक अकाउंटला धक्काही लागणार नाही, असा दावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने केला आहे. आतापर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही.आधार कार्डचा नंबर इतर कोणालाही माहीत असेल तर त्याचे आर्थिक नुकसान झाल्याचे कोणतीही घटना अद्याप घडलेली नसल्याचे यूआयडीएआयने म्हटले आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड