शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

फक्त 2000 देऊन बुक करता येईल ट्रान्सपरंट बॅक असलेला स्मार्टफोन; नथिंग फोन 1 ची बुकिंग अमाऊंट लीक 

By सिद्धेश जाधव | Updated: June 11, 2022 15:01 IST

नथिंग फोन 1 स्मार्टफोन 12 जुलैला लाँच होणार असून त्याआधीच फोनची बरीचशी माहिती समोर येऊ लागली आहे.  

नथिंग कंपनीची स्थापना झाल्यापासून चाहते नथिंग फोन 1 स्मार्टफोनची वाट बघत आहेत. आता कंपनीनं स्वतःहून हा फोन 12 जुलैला लाँच केला जाईल, असं सांगितलं आहे. लिक्स आणि रिपोर्ट्समधून आतापर्यंत या स्मार्टफोनची बरीचशी माहिती लीक झाली आहे. आता एका टिपस्टरनं नथिंग फोन 1 द्या प्री-बुकिंगची माहिती लीक केली आहे.  

बुकिंग अमाऊंट 2000 रुपये 

टिपस्टर मुकुल शर्मानं नथिंग फोन 1 च्या प्री-बुकिंगची माहिती दिली आहे. ट्विट करून एक प्री-बुकिंग कुपनचा फ्लिपकार्ट प्रोडक्ट पेजचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. त्यानुसार हा फोन फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करता येईल आणि खरेदीच्या वेळी हे पैसे अड्जस्ट केले जातील.  

स्मार्टफोनची प्री-बुकिंग अजूनतरी सुरु झाली नाही. परंतु स्क्रिनशॉटमध्ये कुपन फक्त 18 जुलैपर्यंत वैध असेल असं दिसत आहात. त्यामुळे 12 जुलैच्या लाँच इव्हेंटच्या नंतर नथिंग फोन 1 बुक करता येईल अशी अपेक्षा आहे. तर 18 जुलैनंतर फोन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.  

Nothing Phone 1 चे संभाव्य स्पेक्स   

एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Nothing Phone 1 मध्ये 6.55 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येईल, ज्यात 8GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 128GB स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Nothing OS वर चालेल.  

या फोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 8MP ची वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nothing Phone 1 मध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान