शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! उंचावरून पडल्यावर देखील तुटणार नाही हा गेमिंग स्मार्टफोन; एका चार्जमध्ये 8 तास गेमिंग टाइम 

By सिद्धेश जाधव | Updated: July 26, 2021 18:50 IST

Blackview BL5000 Launch: आपल्या रगेड स्मार्टफोन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या Blackview कंपनीने Blackview BL5000 नावाचा गेमिंग स्मार्टफोन लाँच केला आहे.  

Blackview कंपनी आपल्या रगेड स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीने Blackview BL5000 स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा पहिला रगेड गेमिंग स्मार्टफोन आहे जो 5G सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये अनेक पावरफुल गेमिंग फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात कूलिंग सिस्टमसह 3D कूलिंग पाइपचा समावेश आहे. हा फोन Banggood वर 359 डॉलर्स म्हणजे सुमारे 30,300 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. 

Blackview BL5000 चे स्पेसिफिकेशन्स  

Blackview BL5000 मध्ये 6.36 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, हा डिस्प्ले 1080 x 2300 पिक्सल रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 400ppi पिक्सल डेंसिटी आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये मीडियाटेक 700 प्रोसेसर देण्यात आला आहे, या प्रोसेसरला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. 

ब्लॅकव्यू बीएल5000 स्मार्टफोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,065mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन एकदा फुल केल्यास 8 तास गेमिंग टाइम देतो, असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन IP68 आणि IP69K रेटेड वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड