शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कमी किंमतीत उत्तम फिटनेस ! हुआवे फिट, बँड 2 आणि बँड 2 प्रो भारतात लॉन्च

By शेखर पाटील | Updated: November 9, 2017 15:50 IST

हुआवे कंपनीने भारतीय बाजारपेठेत फिट हे स्मार्टवॉच तसेच बँड २ आणि बँड २ प्रो हे फिटनेस बँड सादर करण्याची घोषणा केली आहे.

हुआवे कंपनीने भारतीय बाजारपेठेत फिट हे स्मार्टवॉच तसेच बँड २ आणि बँड २ प्रो हे फिटनेस बँड सादर करण्याची घोषणा केली आहे.हुआवे फिट, बँड २ आणि बँड २ प्रो हे तिन्ही प्रॉडक्ट काही महिन्यांपूर्वीच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आता भारतीय ग्राहकांसाठी याला सादर करण्यात आले आहे. हुआवे फिटचे मूल्य ९,९९९ रूपये असून बँड २ आणि बँड २ प्रो हे मॉडेल्स अनुक्रमे ४,५९९ आणि ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहक यांना अमेझॉनसह देशभरातील शॉपीजमधून खरेदी करू शकतो. हुआवे फिट हे स्मार्टवॉच आहे. याचे डिझाईन अतिशय आकर्षक असून यात इनबिल्ट फिटनेस ट्रॅकर देण्यात आला आहे. म्हणजेच स्मार्टवॉचसह फिटनेस ट्रॅकर म्हणूनही याचा उपयोग करणे शक्य आहे. यात आल्वेज ऑन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला असून हे मॉडेल ब्लॅक, ब्ल्यू आणि ऑरेंज या तीन रंगांच्या पर्यायात सादर करण्यात आले आहे. यात पायी चाललेले अंतर, यातून वापरण्यात आलेल्या कॅलरीज, निद्रेची मात्रा तसेच हृदयाच्या ठोक्यांचे मापन करण्याची सुविधा दिलेली आहे.तर हुआवे बँड २ आणि बँड २ प्रो या मॉडेल्समध्ये हार्ट रेट मॉनिटर प्रणालीच्या माध्यमातून युजरच्या हृदयाच्या ठोक्यांचे मापन करून याची त्याला वेळोवेळी माहिती देण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर बँड २ प्रो या मॉडेलमध्ये याबाबत विश्‍लेषणासह सखोल माहितीची सुविधाही असेल. या दोन्ही मॉडेलमध्ये पॅसिव्ह मॅट्रीक्स ओएलईडी म्हणजेच पीएमओएलईडी या प्रकारातील वॉटरप्रुफ डिस्प्ले प्रदान करण्यात आले आहेत. हे दोन्ही बँड अँड्रॉइडच्या ४.४ तर आयओएसच्या ८.० तसेच यापुढील आवृत्त्यांवर चालणार्‍या स्मार्टफोनशी सुलभपणे कनेक्ट करता येतात. तर हुआवे बँड २ प्रो या मॉडेलमध्ये काही अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने फर्स्टबीट ही प्रणाली असून याच्या मदतीने बँडधारकाच्या शरिरातील ऑक्सीजनच्या वापराचे अचूक मापन करता येते. अर्थात  या माहितीचा स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर यामध्ये इनबिल्ट जीपीएस प्रदान करण्यात आले असून याच्या मदतीने चाललेल्या अंतराबाबतची अचूक माहिती मिळते. हे दोन्ही बँड निळा, काळा आणि लाल या तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहेत.    

टॅग्स :huaweiहुआवे