शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज हुआवे नोव्हा २ एस

By शेखर पाटील | Updated: December 12, 2017 07:00 IST

हुआवे कंपनीने आपला नोव्हा २ एस हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ४ कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

हुआवे कंपनीने आपला नोव्हा २ एस हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ४ कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. हुआवे कंपनीने अनेक उत्तमोत्तम मॉडेल्सच्या माध्यमातून स्मार्टफोनच्या बाजारपेठेतवर आपली पकड घट्ट केली आहे. याच्या जोडीला हुआवेचाच ब्रँड असणार्‍या ऑनरनेही हाच कित्ता गिरवला आहे. या पार्श्‍वभूमिवर नोव्हा २ एस हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली आहे.हुआवे नोव्हा २ एस या स्मार्टफोनमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात ड्युअल कॅमेरा सेटअपचा डबल धमाका आहे. अर्थात यात मागील आणि पुढील या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. हा या स्मार्टफोनचे सेलींग पॉइंटदेखील ठरू शकतो. याच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सल्सचा आरजीबी तर २० मेगापिक्सल्सचा मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे. यांना एफ/१.८ अपार्चर आणि एलईडी फ्लॅश, फेज डिटेक्शन आणि ऑटो-फोकस हे फिचर्स देण्यात आले आहेत. या दोन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रित इफेक्टमुळे अगदी सजीव वाटणारी दर्जेदार छायाचित्रे काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यांच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींगदेखील करता येणार आहे. तर हुआवे नोव्हा २ एस या स्मार्टफोनच्या पुढील बाजूस एफ/२.० अपार्चरयुक्त २० मेगापिक्सल्सचा आरजीबी तर २ मेगापिक्सल्सचा मोनोक्रोम या प्रकारातील कॅमेरे देण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. यामध्ये फेशियल रेकग्नीशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा काढता येत असल्याचे हुआवे कंपनीने नमूद केले आहे.आता वळू या उर्वरीत फिचर्सकडे. तर हुआवे नोव्हा २ एस या मॉडेलमध्ये सहा इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि २१६० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच एचडी प्लस क्षमतेचा कडाविरहीत २.५डी वक्राकार डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात हुआवेचाच ऑक्टा-कोअर किरीन ९६० प्रोसेसर दिलेला आहे. याचे तीन व्हेरियंट ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यात ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज; ६ जीबी रॅम व ६४ जीबी रॅम तसेच ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज या तीन व्हेरियंटचा समावेश असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा इएमयुआय ८.० हा युजर इंटरफेस असेल. तर या स्मार्टफोनमध्ये ३,३४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.हुआवे नोव्हा २ एस या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ड्युअल बँड वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, ग्लोनास, एनएफसी, युएसबी टाईप-सी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनला पहिल्यांदा चीनमध्ये सादर करण्यात आले असले तरी लवकरच हे मॉडेल भारतात येण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान