शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टॅबलेट विक्रीतही अ‍ॅपल अव्वल; आयपॅडची आघाडी कायम

By शेखर पाटील | Updated: August 4, 2017 14:20 IST

गेल्या काही वर्षांपासून विक्रीत फारशी वाढ न होणार्‍या आयपॅडची जादू कायम असून आणि अर्थानच टॅबलेट विक्रीतही अ‍ॅपलची घोडदौड सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून विक्रीत फारशी वाढ न होणार्‍या आयपॅडची जादू कायम असून आणि अर्थानच टॅबलेट विक्रीतही अ‍ॅपलची घोडदौड सुरू असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

अ‍ॅपल कंपनीने आपल्या दुसर्‍या तिमाहीतील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात आयफोनच्या विक्रीचा चढता आलेख कायम असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. यासोबत आयफोनला दहा वर्षे झाली असल्याचे औचित्य साधून अ‍ॅपलने पहिल्यांदा दशकाचा आढावा प्रस्तुत केला आहे. यात आजवर जगभरात १२० कोटी आयफोन विकले गेल्याचे जाहीर झाले आहे. यातील ४.१ कोटी आयफोन हे गेल्या तिमाहीत विकले गेले आहेत हे विशेष. तर गत तिमाहीत १.१४ कोटी आयपॅड विकले गेले आहेत. गेल्या वर्षाच्या तिमाहितील आकडेवारीपेक्षा हा आकडा तब्बल १५ टक्क्यांनी जास्त आहे. अ‍ॅपलची घोडदौड ही तशी अपेक्षित बाब असली तरी आयपॅड या टॅबलेट मॉडेलच्या विक्रीतील उसळी ही अनपेक्षीत आणि अर्थातच कंपनीला नवीन उभारी देणारी ठरली आहे.

अ‍ॅपलच्या इतिहासाच आयपॅड या टॅबलेट मॉडेलला अनन्यसाधारण महत्व आहे. या टॅब्लेटने गुणवत्तेचा एक मापदंड प्रस्थापित केला असून अ‍ॅपलच्या अलीकडच्या कालखंडात तुफान लोकप्रिय झालेल्या आयमॅक, आयपॉड आणि आयफोन या प्रॉडक्टप्रमाणे हे मॉडेलही आयकॉनिक ठरले आहे. मात्र गत काही वर्षात आयपॅड टॅबलेट मॉडेलच्या विक्रीची गती मंदावली होती. यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात होती. एक तर सॅमसंग आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मातब्बर कंपन्यांच्या फ्लॅगशीप मॉडेल्ससोबत काही चिनी कंपन्यांनी किफायतशीर दरात सरस फिचर्सयुक्त टॅब्लेट सादर केल्यामुळे आयपॅडला मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाल्याचे मानले जात होते. तर दुसरीकडे स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे संगणकासह टॅब्लेटच्या विक्रीवरही विपरीत परिणाम झाल्याचा हा परिणाम मानला गेला होता. तथापि, या तिमाहितल्या कामगिरीमुळे आयपॅड मॉडेलची जादू कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. येत्या काही दिवसांमध्येच नवीन आयफोनसह आयपॅडचे नवीन मॉडेल लाँच करण्यात येणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये नेमके कोणते फिचर्स असतील? याबाबत आता उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.