शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

सेल्फीला कलाकृतीत परिवर्तीत करणारे अ‍ॅप

By शेखर पाटील | Updated: January 16, 2018 12:33 IST

गुगलने आपल्या आर्टस् अँड कल्चर अ‍ॅपचे अपडेट सादर केले असून आता कुणीही हे अ‍ॅप वापरून आपल्या सेल्फीला एखाद्या कलाकृतीत परिवर्तीत करू शकतो.

सेल्फी तसेच अन्य प्रतिमांना पेंटिंगच्या विविध प्रकारांमध्ये परिवर्तीत करणारे प्रिझ्मा हे अ‍ॅप सध्या खूप लोकप्रिय ठरले आहे. याच प्रकारात मात्र थोड्या वेगळ्या पध्दतीत गुगलचे आर्टस् अँड कल्चर अ‍ॅप कार्य करणार आहे. यात कुणीही युजर सेल्फी काढून अपलोड करू शकतो. यानंतर या सेल्फीतील चेहरा गुगल आर्ट अँड कल्चर अ‍ॅपवर असणार्‍या जगभरातील विविध कलाकृतींपैकी नेमका कोणत्या कलाकृतीशी जुळतो? याचे पर्याय त्या युजरला देण्यात येतात. यातील योग्य पर्याय तो युजर निवडू शकतो. यात संबंधीत चेहरा नेमका किती टक्के मॅच होतो? याची माहितीदेखील देण्यात येते. ही तुलना करणारी प्रतिमा सोशल मीडियासह विविध माध्यमांमधून शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. गुगलचे हे अ‍ॅप आधीच लोकप्रिय असून यात या नवीन फिचरचा समावेश करण्यात आल्यामुळे ते आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.

आर्टस् अँड कल्चर अ‍ॅप यासाठी पॅटर्न रिकग्निशन आणि कृत्रीम बुध्दीमत्ता या प्रणालीचा वापर करत असते. ही सुविधा तशी अद्याप प्रायोगिक अवस्थेत असून लवकरच यात अजून अचूकता प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती रिकोड या टेक पोर्टलने दिली आहे. दरम्यान, हे अद्ययावत अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलचे अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचे युजर्स याचा वापर करू शकतील.

गुगल आर्टस् अँड कल्चर अ‍ॅप हे आधीच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. यात जगभरातील आघाडीच्या तब्बल १२०० वस्तुसंग्रहालयांमधील माहिती देण्यात आलेली आहे. या संग्रहालयांमधील सर्व मौल्यवान कलाकृतींना कुणीही युजर अगदी घरबसल्या पाहू शकतो. यात अनेक संग्रहालयांचे ३६० अंशातील चित्रीकरणही देण्यात आले आहे हे विशेष.

डाऊनलोड लिंकअँड्रॉइड प्रणाली

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.cultural&hl=en

आयओएस प्रणाली

https://itunes.apple.com/in/app/google-arts-culture/id1050970557?mt=8 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSelfieसेल्फी