शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमेझॉन पे लवकरच युपीआयशी होणार संलग्न

By शेखर पाटील | Updated: November 3, 2017 11:04 IST

अमेझॉन पे ही डिजीटल पेमेंट सिस्टीम लवकरच केंद्र सरकारच्या युपीआय या प्रणालीशी संलग्न होणार असल्याचे वृत्त असून याची सध्या चाचणी सुरू आहे.

केंद्र सरकारच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम्सची लोकप्रियता वाढू लागल्याचे दिसून येत आहे. आता बहुतांश कंपन्या युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम्सला प्राधान्य देत आहेत. देशातील ५० पेक्षा जास्त सरकारी व खासगी बँकांनी या प्रणालीचा अवलंब केला आहे. तसेच फ्लिपकार्टची मालकी असणारे फोनपे, गुगलचे खास भारतीयांसाठी सादर करण्यात आलेले तेज अ‍ॅप, पेटीएम, उबर आदींच्या पेमेेंट सिस्टीमध्येही युपीआयचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. तर व्हाटसअ‍ॅपदेखील याची चाचणी घेत आहे. भारतात युपीआयवर आधारित व्यवहारांची संख्या वाढत आहे. सप्टेबर-२०१७मध्ये युपीआयवर आधारित व्यवहारांमध्ये तब्बल ८५ टक्के वाढ होत ३ कोटी व्यवहार झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर आता अमेझॉन पे या प्रणालीतही याचा वापर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले असून ताज्या वृत्तानुसार याची चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे.

अमेझॉन कंपनीने भारतावर जाणीवपूर्व लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. खुद्द अमेझॉनने ई-कॉमर्सच्या क्षेत्रात आघाडी घेतली असून आता अन्य उत्पादनेही भारतात आक्रमकपणे लाँच करण्यात येत आहेत. याचप्रमाणे अमेझॉन पे ही प्रणालीदेखील भारतात जोरदार पध्दतीने प्रमोट करण्याचा या कंपनीचा मानस असल्याचे दिसून येत आहेत. या अनुषंगाने अलीकडेच अमेझॉन पे मध्ये तब्बल १,६०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामुळे आता या सेवेचा विस्तार होणार असून याचमुळे युपीआयशी संलग्नता घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानamazonअॅमेझॉन