शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अ‍ॅमेझॉन कंपनीने 10 लाखांहून अधिक प्रॉडक्ट्स हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 15:08 IST

Coronavirus: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत.

ठळक मुद्देसध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे.10 लाखहून अधिक प्रॉडक्ट्स अ‍ॅमेझॉन  कंपनीने हटविले

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरससंबंधी दिशाभूल किंवा भ्रामक दावा करण्यात येणारे 10 लाखांहून अधिक प्रॉडक्ट्स अ‍ॅमेझॉन  कंपनीने हटविले आहेत. तसेच, ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोप होता, त्या थर्ड-पार्टी मर्चेंट्सच्या हजारो ऑफर्स सुद्धा कंपनीने रद्द केल्या आहेत. CNBCसोबत बोलताना कंपनीने यासंदर्भात माहिती दिली. 

कंपनीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, अ‍ॅमेझॉनवर कोणत्याही प्रॉडक्ट्साठी चुकीची किंमत वसूल करणाऱ्यांसाठी कोणतीच जागा नाही आहे. उचित मूल्य निर्धारण विषयीचे आमचे दीर्घकालीन धोरण स्पष्टपणे सांगते की, आम्ही ग्राहकांच्या आत्मविश्वासाला हानी पोहचविणाऱ्या किंमतींना परवानगी देत नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. 

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन कंपनीने असेही म्हटले आहे की, कंपनी प्लॅटफॉर्मवर नजर ठेवेल आणि किंमती वाढविण्याच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या ऑफर्स काढून टाकेल. तसेच, कोरोना व्हायरससंबंधी भ्रामक किंवा दिशाभूल करणार्‍या वस्तूंची विक्री करणारे अकाउंट्स देखील निलंबित केली जातील किंवा पूर्णपणे काढून टाकली जातील.

याशिवाय अ‍ॅमेझॉन कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरस, COVID-19, n95  मास्क आणि यांसारखे संबंधीत सर्चेसमध्ये एक नोटीस अॅड केली आहे. जे रोगाचा प्रतिबंध आणि उपचार याविषयी अधिक माहितीसाठी युजर्संना सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन वेबसाइटवर घेऊन जात आहे. 

दरम्यान, अ‍ॅमेझॉन सुद्धा त्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. ज्या कंपन्यांची फेब्रुवारी महिन्यात कॅलिफोर्नियातील फेसबुकच्या मेनलो पार्कमध्ये जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना व्हायरससंबंधी चुकीची माहिती टाळण्यासंबंधीची चर्चा झाली होती. 

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतात 25 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. 

चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

(Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...)

(Coronavirus: भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प)

(कोरोनाच्या काळजीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा!)

टॅग्स :corona virusकोरोनाamazonअ‍ॅमेझॉन