शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अलेक्झा असिस्टंटयुक्त वायरलेस इयरबडस्

By शेखर पाटील | Updated: February 26, 2018 19:24 IST

जॅब्रा कंपनीने अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटने सज्ज असणारे एलीट ६५ टी हे वायरलेस इयरबडस् बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

जॅब्रा कंपनीने अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटने सज्ज असणारे एलीट ६५ टी हे वायरलेस इयरबडस् बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

जॅब्राने आधीच भारतीय ग्राहकांसाठी एलीट स्पोर्टस् हे वायरलेस इयरबडस् लाँच केले आहे. यानंतर आता एलीट ६५ टी हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे अर्थातच अमेझॉनने विकसित केलेला अलेक्झा हा डिजीटल असिस्टंट होय. या असिस्टंटला ध्वनी आज्ञावली म्हणजे व्हाईस कमांडच्या मदतीने कार्यान्वित करता येते. याशिवाय यात सिरी आणि गुगल असिस्टंट या अनुक्रमे अ‍ॅपल आणि गुगलच्या व्हाईस असिस्टंटचाही सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने संगीत प्ले करणे, आवाज कमी-जास्त करणे, म्युझिक ट्रॅक बदलणे आदी फंक्शन्स पार पाडता येतात. याशिवाय, याला कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करणे वा रिसीव्ह करणे आदी बाबीदेखील याच्या मदतीने शक्य आहेत. जॅब्रा साऊंड प्लस या अ‍ॅपच्या मदतीने या मॉडेलचा अतिशय उत्तम प्रकारे वापर करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांपर्यंत वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे इयरबडस् वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असून याला दोन वर्षांची वॉरंटी प्रदान करण्यात आली आहे. सध्या हे इयरबडस् टिटॅनियम ब्लॅक या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना १२,९९९ रूपये मूल्यात अमेझॉन इंडिया या पोर्टलसह क्रोमा स्टोअर्समधून उपलब्ध करण्यात आले आहेत.