शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्काटेलचा फोर-जी टॅबलेट

By शेखर पाटील | Updated: February 21, 2018 16:15 IST

अल्काटेल कंपनीने फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारा पीओपी४ १० फोर-जी हा टॅबलेट भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

अल्काटेल कंपनीने फोर-जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणारा पीओपी४ १० फोर-जी हा टॅबलेट भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

अल्काटेलने आधी बाजारपेठेत पीओपी४ १० हा टॅबलेट उपलब्ध केलेला आहे. हे मॉडेल फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणारे होते. याचीच पुढील आवृत्ती फोर-जी या मॉडेलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. यात कुणीही फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट असणारे सीमकार्ड टाकून व्हाईस कॉलींगसह इंटरनेटचा वापर करू शकतो. फिचर्सचा विचार केला असता या मॉडेलमध्ये १०.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी८१२७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर हा टॅबलेट ८ व ५ मेगापिक्सल्सच्या अनुक्रमे मुख्य व फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज आहेत. यातील बॅटरी ५८३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात प्राथमिक व माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित अ‍ॅप इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यात हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या माध्यमांमधील पुस्तके असून यांचा ऑफलाईन वापरदेखील करता येतो. 

अल्काटेल पीओपी४ १० या मॉडेलमध्ये वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, ब्ल्यु-टुथ, वाय-फाय डायरेक्ट, हेडफोन जॅक आदी फिचर्स दिलेले आहेत. हा टॅबलेट ग्राहकांना १०,९९९ रूपये मूल्यात फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.